॥ आरती गुरू गजाननाची ॥
जय जय सच्चिदानंद । स्वामी गजानना ।
आरती ओवाळू तुज । तार तू मूढ जना ॥
जयदेव जयदेव ॥ धृ ॥
अचेतनासी चेतन करिशी । तव लीलेतूनी ।
नित्य अनित्य बोध करिशी । तू तव भक्तांसी ॥
जयदेव जयदेव ॥ १ ॥
नवस नका हो विसरू । सांगशी भक्तांसी ।
नवस पूर्ण होता । चमत्कृती दाविशी ॥
जयदेव जयदेव ॥ २ ॥
कुठचेहि संकट असुद्या । पाच वार्यांत निवारिसी ।
शेगावचा महिमा तू । जगी अमर करिशी ॥
जयदेव जयदेव ॥ ३ ॥
वेदांचे सार सांगशी । तू तव भक्तांसी ।
चमत्कृतीतुनी ज्ञानी । तू त्यांना करिशी ॥
जयदेव जयदेव ॥ ४ ॥
व्याधी मुक्त करिशी । नर-नारायण करिशी ।
गणामहाराज प्रार्थे । रक्ष तू भक्तांसी ॥
जयदेव जयदेव ॥ ५ ॥