॥ योगिराज गजानन महाराज धुन ॥
ॐ नमो सद्गुरू । श्री गजानन बाबा ।
श्री गजानन बाबा । श्री गजानन बाबा ॥
दिगंबरा गजानना । यावे तू रक्षणा ॥
गुरू गजानन या हो । स्वामी मला भेट द्या हो ॥
मला गजानन छंद । जो करी नामजपात धुंद ॥
मुखे गजानन बोला । गण गण गणात बोते बोला ॥
स्वामींचा आमच्या घरी वास । षड्रिपुंचा होतो त्याने नाश ॥
माझा गजानन भोळा । स्मरता दर्शन वेळोवेळा ॥
गोपाळा गोपाळा । गजानन बाबा गोपाळा ।
साईबाबा गोपाळा । गजानन बाबा गोपाळा ॥