गण गण गणात बोते । हा मंत्र प्रिय गजाननाते ।
ह्यातले सामर्थ्य इतुके । व्यवहारातले बोल फिके ।
नामजपावर जे घडे, मिळे । ते अश्रद्धावानास न मिळे ।
श्रद्धावान भोगे प्रारब्ध सहजतेने । अश्रद्धावान चिंतेने ।
जो असतो ह्या मंत्र जपावरी । तो न गुरफटणार व्यवहारी ।
ऐसी ज्याची होते स्थिती । चिंतेची न राहे भिती ।
हा मंत्र जपण्यात बने निर्भय । संकटाचा होतो पराजय ।
शुद्ध हेतू पूर्ण होई । चिंता, क्लेश, दुःख न राही ।
ह मंत्र जपावा नित्य नेमाने । गणामहाराज सांगे अनुभवाने ।