गण गण गणात बोते । हा मंत्र प्रिय गजाननाते ।
अहर्निष जपला गजानने । अष्टौ सिद्धी लाभल्या त्याने ।
मंत्र जपावा नित्यनेमाने । प्रारब्ध सुसह्य त्याने ।
चमत्कृतीमय होते जीणे । खात्री होते जपता श्रद्धेने ।
कुठच्याही प्रसंगी निर्भीडपणे । तोंड देता सहजपणे ।
चिंता, क्लेश, दारिद्र्य, दुखणे । निवारण मंत्र जपाने ।
मंत्र जपता विविध दर्शने । गजाननाशी संभाषणे ।
श्रद्धेने जपावा प्रत्येकाने । गणामहाराज सांगे स्वानुभवाने ।