नमस्कार माझा तया गजाननाला ।
जो धावून येई भक्तांच्या हाकेला ॥ धृ ॥
ठिणगीवाचून चिलिमीस पेटवले ।
कोरड्या विहिरीत जल उत्पन्न केले ।
जानरावाचे गंडांतर तीर्थाने टाळले ।
आशिर्वादे खंडूस पुत्र रत्न झाले ॥ १ ॥
मारुतीपंताच्या रक्षिले मळ्याला ।
पितांबरावरील प्रसंग निवारला ।
दिल्या पादुका त्या पुंडलीकाला ।
विठ्ठल दर्शन बापुना काळ्याला ॥ २ ॥
बेडीमुक्त केले खंडुपाटिलाला ।
ऋणमुक्त केले बंडुतात्याला ।
सुरुंगातुन वाचवले गणू जवर्याला ।
रक्षीले ज्याने बायजेच्या अब्रूला ॥ ३ ॥
गंगाभारती झाला महारोग मुक्त ।
वारकरी झाला कॉलरा मुक्त ।
तुक्याच्या कानातुन छरा निघाला ।
अंगार्याने भाऊस व्याधिमुक्त केला ॥ ४ ॥
दिले संसारसुख हरी जाखड्याला ।
योगविद्या शिकवली निमोणकराला ।
बाळकृष्णास दिले रामदास दर्शन ।
हरी पाटिलाला दिले विठ्ठल दर्शन ॥ ५ ॥