१) जगत् निर्मात्याचे, चालकाचे, कुलदेवतेचे, दत्तात्रेयाचे.
२) मातापित्याचे – ज्यांनी उत्तम संस्काराचे बीज पेरले.
३) पत्नीचे – जिने मला सन्मार्गाला लावले, समाधानी वृत्तीचे महत्व पटवले, भक्तिमार्गात सर्वतोपरी सहाय्य केले.
४) प. पू. गजानन महाराज (शेगाव) यांचे – ज्यांनी मला नामजपाचे महत्व पटवले, वेड लावले, त्यातच तल्लीन केले, नाम व रूप यात श्रेष्ठ काय ते पटवले, तसेच “नामजप ऐसा करावा । जेणे गुरू स्वयेच घरी यावा । आपण व्हावे भगवंताचे । एकनिष्ठेने गुरूचे । तेणे ताप न प्रपंचाचे ॥” हे पटवले. “गण गण गणात बोते” मंत्र जपा मुळेच प.पू. पांडुरंग शास्त्री आठवले यांचे गुरू चरण लाभले.
५) संत दासगणू महाराज, श्री. सकळकळे, डॉ. भिंगारकर ह्यांनी गुरू गजानन महाराज यांच्या लीला आपल्या लेखन शैलीने मनावर ठसवल्या.
६) प.पू. पांडुरंग शास्त्री आठवले – ज्यांनी नामजप आसन सिद्ध करून दिले. कृपाशिष देऊन काव्य शक्ती जागृत केली. नामजपात वारंवार दर्शन देऊन आत्मज्ञान नि तत्वज्ञानाच्या चिंतनात ठवले.
७) मुलांचे – नामजप सेवेत एकरूपता साधण्यास माझा पुत्र देवेंद्र व कन्या प्रज्ञा दोघांनी वेळोवेळी सहाय्य केले.
८) हितचिंतक, भक्तगण, ग्रंथास सहाय्यकर्ते, ज्यांच्यामुळे हा ग्रंथ भक्तांच्या हाती आला, त्या सर्वांचा मी ऋणी आहे.
९) इसवी सन १९९८ मध्ये सदर ग्रंथ सुपुत्र श्री. देवेंद्र व त्यांच्या पत्नी सौ. पल्लवी देवेंद्र फडके ह्यांनी अमेरीकेत वास्तव्य असताना कोम्प्यूटर सेटिंग केले.
१०) श्री गुरू आज्ञेनुसार दिनांक २४ फेब्रुवारी २००६, माघ वद्य ११ (विजया एकादशी) शके १९२७ शुक्रवारी ग्रंथ छापण्यास सुरुवात झाली.
११) गजानन महाराजांच्या प्रेरणेने व आशिर्वादाने हा ग्रंथ इंटरनेट वर रवीवार भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) शके १९४२, दिनांक २३ ऑगस्ट २०२० या दिवशी सर्व भक्तांस https://www.ganamaharaj.org/ या वेबसाईट वर उपलब्ध झाला.