रामकृष्ण हरी । भवसागर तारी ॥
योगेश्वर माझ्या घरी । चिंता न राहिली उरी ॥
विठ्ठल रखुमाई घरी । पंढरीच आली घरी ॥
-: नामानुभव :-
- गणामहाराज
नाम म्हणजे माऊली । सदा कृपेची सावली ॥
पांडुरंग गुरू माऊली । कृपा छत्री लाभली ॥
गजानन माझी माऊली । भक्तासाठी धावली ॥
समर्थ माझी माऊली । दत्त कृपेची सावली ॥