सांगे गणामहाराज । भजा भजा नाम रोज ।
नाही वाटणार बोज । तेणे मन शुद्ध रोज ॥ १ ॥
माझे गुरू गजानन । सांगती मज निक्षुन ।
नामात धुंद होऊन । जाशील भव तरून ॥ २ ॥
गण गण गणात बोते । गुरू जाहले सांगते ।
नित्य भज झाले वदते । नित्य अनित्य कळते ॥ ३ ॥
अरे! तुझा गुरू कोण? । नामात पटेल खुण ।
तळमळ नि ध्यासातुन । गुरुस आणशील ओढुन ॥ ४ ॥
जे जे वदले गजानन । तंतोतंत खरे जाण ।
नामाचे सप्ताह करवुन । भेट दिली घडवुन ॥ ५ ॥
माझे गुरू पांडुरंग । तेणे जडला सत्संग ।
नामात भेटती रोज । तैसे तुम्हां भेटो रोज ॥ ६ ॥
गुरू पांडुरंग शास्त्री । लाभली कृपा छत्री ।
नामात झाली खात्री । अष्टौप्रहर रात्री ॥ ७ ॥
ज्याला लाभे साधुसंग । त्याला जडतो सत्संग ।
तेणे शुद्ध अंतरंग । तुम्हा सांगे पांडुरंग ॥ ८ ॥
नामात न मिळे काय ? । नामात तरते नांव ।
नामात दूर दूर हाव । पांडुरंग करे सोय ॥ ९ ॥
नित्य नाम आळवावे । काम काळ घालवावे ।
पांडुरंगी लीन व्हावे । पांडुरंग शांती दावे ॥ १० ॥
अंतरंग उकलावे । रुचेल ऐसे बोलावे ।
कटुसत्य पटवावे । पांडुरंग मार्ग दावे ॥ ११ ॥
कर्तव्य कर्म करावे । प्रपंची न लीप्त व्हावे ।
अकर्ता भावे जगावे । पांडुरंग हीत दावे ॥ १२ ॥
नामे पळते आसक्ती । नामे साधते विरक्ती ।
नामे पळते अशांती । पांडुरंग दावे शांती ॥ १३ ॥
माया चित्तास भुलवे । क्षणभंगुरी रमवे ।
माया सर्वांस फसवे । पांडुरंगाचे ऐकावे ॥ १४ ॥
नका गुरफटु मोहात । चित्तास जाळतो क्षणात ।
पांडुरंग म्हणे नामात । अनुभवाल चित्त शांत ॥ १५ ॥
येता जाता घेता नाम । भगवंताचा मुक्काम ।
आपल्याच घरी ठाम । पांडुरंग शांती धाम ॥ १६ ॥
जो सदा राहतो नामात । भगवंत त्याचे दारात ।
नाम घेण्या मिळे निवांत । पांडुरंग बोल सत्य ॥ १७ ॥
राहुन कर्तव्य कर्मात । जरी येई नाम मुखात ।
सहज सोपे सर्वश्रेष्ठ । पांडुरंग म्हणे नामात ॥ १८ ॥
नित्य स्मरा नारायण । तेणे लक्ष्मी प्रसन्न ।
चिंता क्लेश पलायन । पांडुरंग समाधान ॥ १९ ॥
योगेश्वरास भजता । शांती समाधान चित्ता ।
करा योगेश्वर कर्ता । पांडुरंग म्हणे त्राता ॥ २० ॥
योगेश्वर ऐसे नाम । तेणे साधे योगक्षेम ।
पांडुरंग दावे नाम । तेणे शांती दया प्रेम ॥ २१ ॥
ज्याच्या मुखी नाम सदा । तेणे टळते आपदा ।
पांडुरंग म्हणे वदा । शिव शिव शंभो सदा ॥ २२ ॥
भगवंतास स्मरावे । चिंता क्लेश विसरावे ।
तेणे चित्ता तोषवावे । पांडुरंग मार्ग दावे ॥ २३ ॥
भगवंताच्या नामात । आनंद येतो पुढ्यात ।
पांडुरंग म्हणे त्यात । चिंता क्लेश टळतात ॥ २४ ॥
चिंतेने मन उद्विग्न । नामाने मन प्रसन्न ।
नामात जाल तरून । पांडुरंग शिकवण ॥ २५ ॥
नको चिंता चिंतन । जेणे प्रसंग दारुण ।
पांडुरंग सांगे निक्षुन । नामात जाल तरुन ॥ २६ ॥
गुरूस सदा नमावे । त्याचेच बोल ऐकावे ।
दुसर्यास विसरावे । पांडुरंग हीत दावे ॥ २७ ॥
गुरू आज्ञा पालनात । नाम राहते मुखात ।
तेणे भगवंत दारात । चिंता क्लेश टळतात ॥ २८ ॥
ऐसे नाम आळवावे । भगवंताने ऐकावे ।
हांक मारता धावावे । आपत्काळी रक्षावे ॥ २९ ॥
नामानेच होते ज्ञान । पळून जाते अज्ञान ।
तेणे होते आत्मज्ञान । पांडुरंग तत्वज्ञान ॥ ३० ॥
सर्वव्यापी चराचरी । नामाने तोषतो भारी ।
पांडुरंग म्हणे दारी । आला मागाया शिदोरी ॥ ३१ ॥
नामात तुम्ही राहाता । आनंद अनुभवता ।
आत्म्यास तृप्त करता । पांडुरंग नाम त्राता ॥ ३२ ॥
माझा जन्म कशासाठी ? । नाम स्मरणासाठी ।
तेणे भेटे जगत्जेठी । पांडुरंग सदा पाठी ॥ ३३ ॥
भगवंतास भजता । तेणे भेटे जगत्त्राता ।
चरणी ठेवता माथा । पांडुरंग ठरे त्राता ॥ ३४ ॥
नाम स्मरा हो नाम । तेणे आनंद धाम ।
भगवंत मुक्काम । पांडुरंग सोपे नाम ॥ ३५ ॥
नाम येता मुखावरी । चिंता पळते सत्वरी ।
श्रद्धा ठेवा एकावरी । तेच ठरे हितकारी ॥ ३६ ॥
सदा “सदा” भजावे । भवदुःख हरावे ।
आनंद अनुभवावे । तेच् हीत मानावे ॥ ३७ ॥
जीव रमवा नामात । तेच् उपयुक्त प्रसंगात ।
पांडुरंग म्हणे नामात । जडतो आनंद क्षणात ॥ ३८ ॥
नामात होता तल्लीन । विसराल देहभान ।
होता त्यात रममाण । पांडुरंग दर्शन ॥ ३९ ॥
आळवावे नामाने । प्रसन्न व्हावे त्याने ।
जगाल खात्रीने । शांती समाधानाने ॥ ४० ॥
नामात होते तृप्ती । नामाने जडे शांती ।
नको भलत्या पाठी । जगावे नामासाठी ॥ ४१ ॥
भगवंत सर्व व्याप्त । खुण पटते नामात ।
पांडुरंग म्हणे सत्य । अनुभवाल नामात ॥ ४२ ॥
श्रद्धा ठेवा नामात । आनंद येईल पुढ्यात ।
रहाल आनंदात । तरणोपाय नामात ॥ ४३ ॥
भजा भजा पांडुरंग । तेणे शुद्ध अंतरंग ।
तेणे जडे सत्संग । सांगे तुम्हा पांडुरंग ॥ ४४ ॥
रामनाम जपावे । भवाब्धी तरावे ।
रामनाम भजावे । सार्थक करावे ॥ ४५ ॥
रामनाम भजण्यात । आनंद तत्क्षणात ।
चिता क्लेश टळतात । प्रसन्नता चित्तात ॥ ४६ ॥
नाम आळवा नाम । तेणे गुरू मुक्काम ।
तेणे आनंद धाम । सच्चिदानंद धाम ॥ ४७ ॥
नामाने सर्व प्राप्त । कळे आप्त इष्ट ।
वेळ प्रसंगात । कोण उपयुक्त ॥ ४८ ॥
नामात रमतो जीव । तेणे आनंदतो जीव ।
नामात आनंद ठेव । पांडुरंग स्वानुभव ॥ ४९ ॥
श्रद्धा ठेवा नामावर । तेणे तरले आजवर ।
जो नामात राहाणार । आनंद अनुभवणार ॥ ५० ॥
नित्य आळवा श्रीरंग । तेणे जडे सत्संग ।
नित्य त्यात होता दंग । तेणे भेटतो श्रीरंग ॥ ५१ ॥
नित्य श्रीरंग स्मरा । भव सागर तरा ।
तेणे तोल सावरा । नामाचा मार्ग बरा ॥ ५२ ॥
श्रीहरी भजा श्रीहरी । तेणे तरले आजवरी ।
श्रीहरीच सोय करी । तोच जीवास उद्धरी ॥ ५३ ॥
साधुसंतांचे ऐका । नामाने तरा नौका ।
आत्म्याचा आवाज ऐका । बोजा होईल हलका ॥ ५४ ॥
भगवंतास काय प्रिय ? । भगवंतास नाम प्रिय ।
नामे होई भक्त प्रिय । नामानेच केली सोय ॥ ५५ ॥
हरीस प्रिय भजन । प्रिय नामस्मरण ।
करता गुणगान । हरी तोषे मनोमन ॥ ५६ ॥
नामात होता तल्लीन । न शिवे विचार मलीन ।
तेणे घडे सद्वर्तन । उपयुक्त नामस्मरण ॥ ५७ ॥
नामाचे नाद घुमवा । नामात मन रमवा ।
भगवंतास भुलवा । भगवंतास तोषवा ॥ ५८ ॥
नामे टळे अहंकार । नामे भेटे निराकार ।
नामाने होतो साकार । भक्तास रक्षणार ॥ ५९ ॥
जे जे नामात रमले । भवसागर तरले ।
सांगे तथ्य नामातले । पांडुरंग आठवले ॥ ६० ॥
नाम येता मुखावरी । भेटे श्रीहरी सत्वरी ।
चिंता क्लेश जाते दुरी । नाम जीवास उद्धरी ॥ ६१ ॥
रमा रमा नामात । नित्य रहावे नामात ।
नामाच्या सातत्यात । भगवंत दारात ॥ ६२ ॥
नामाचे दास होण्यात । मायापाश तुटतात ।
तेणे हरी भेटतात । चिंता क्लेश टळतात ॥ ६३ ॥
सदा भजा शिवासी । तेणे सदा पाठीशी ।
भजता सदा शिवासी । सदाशिव दाराशी ॥ ६४ ॥
नाम रसाळ मधुर । नामाची फळे मधुर ।
ती चाखण्या अधीर । येतो हरी सत्वर ॥ ६५ ॥
कुणी कृष्ण म्हणा । कुणी राम म्हणा ।
नाम मुखे म्हणा । तेच येते रक्षणा ॥ ६६ ॥
रामकृष्ण हरी । भवसागर तारी ।
त्याच्याच नामावरी । तरले आजवरी ॥ ६७ ॥
रामनाम घ्यावे । नौकेत बसावे ।
भवाब्धी तरावे । निश्चिंत असावे ॥ ६८ ॥
नामात सुटे भवपाश । नामात भेटे जगदीश ।
सकळ दुःख नाश । विनासायास ॥ ६९ ॥
नका विसरू योगेश्वरा । तोच जीवनी साथी खरा ।
सहाय्यभूत निराधारा । पांडुरंग बोल खरा ॥ ७० ॥
योगेश्वरा आळवावे । चित्ता प्रसन्न करावे ।
शांती समाधाने जगावे । पांडुरंग मार्ग दावे ॥ ७१ ॥
योगेश्वर बंधु सखा । कुणा न करे पारखा ।
थोर गरीब सारखा । पांडुरंगाचा सखा ॥ ७२ ॥
नित्य स्मरा योगेश्वर । तेणे तरले आजवर ।
शांती समाधान कोठार । पांडुरंगाचा आधार ॥ ७३ ॥
भजा भजा योगेश्वरा । तेणे तरले आजवरा ।
अशांतीस पार विसरा । पांडुरंग आचरा ॥ ७४ ॥
नाम ज्याच्या मुखात । योगेश्वर दारात ।
समाधान नामात । पांडुरंग दावतात ॥ ७५ ॥
अहर्निष नामात । ध्यास लागे चित्तात ।
पांडुरंग म्हणे त्यात । योगेश्वर प्रकटतात ॥ ७६ ॥
येता जाता नाम वदता । तेणे आनंद अमृत साठा ।
योगेश्वर ठरे कर्ता । पांडुरंग म्हणे त्राता ॥ ७७ ॥
कैसे विसरू योगेश्वरास ? । हेच ठसवा चित्तास ।
पांडुरंग म्हणे त्यास । सदा आनंद उल्हास ॥ ७८ ॥
योगेश्वर नामात । वासना विरतात ।
पांडुरंग म्हणे त्यात । प्रसन्नता चित्तात ॥ ७९ ॥
योगेश्वर ऐसे नाम । कापे काळ काम ।
समाधान मुक्काम । पांडुरंग म्हणे ठाम ॥ ८० ॥
माझा योगेश्वर । सर्वांस आधार ।
नामात पटणार । भरंवसा पांडुरंगावर ॥ ८१ ॥
विसंबता नामावर । भेटे योगेश्वर ।
तोच चित्ता तोषणार । पांडुरंग वदणार ॥ ८२ ॥
पांडुरंग तरे नामावर । ठेवा भरंवसा त्यावर ।
तेणे भेटे योगेश्वर । अनुभवे सांगणार ॥ ८३ ॥
नामे जडे स्वाध्याय । अमृताची कोय ।
आनंदाचा संचय । पांडुरंगे केली सोय ॥ ८४ ॥
खरा स्वाध्यायी कोण ? । नाम पटवते खुण ।
नाम करे शंका निरसन । पांडुरंग सांगे निक्षुन ॥ ८५ ॥
नाम शिकवे स्वाध्याय । खरा खुरा गुरू होय ।
जडे अमृताची ठेव । पांडुरंगे केली सोय ॥ ८६ ॥
नित्य नाम भजण्यात । वृत्ती आनंदतात ।
सत्कर्मे घडतात । पांडुरंग वदतात ॥ ८७ ॥
नित्य नाम भजावे । नित्य अनित्य पहावे ।
आत्म्यास तोषावे । पांडुरंग हीत दावे ॥ ८८ ॥
नित्य नाम भजता । भेटतो जगत्त्राता ।
शांती समाधान चित्ता । कर्मे करून अकर्ता ॥ ८९ ॥
नित्य नाम वदावे । भगवंता आळवावे ।
चिंता क्लेश टाळावे । गुरू बोल ऐकावे ॥ ९० ॥
ऐसे नाम आळवा । भगवंत तोषावा ।
चित्ता आनंद व्हावा । जीव सार्थक करावा ॥ ९१ ॥
भजता नित्य नाम । कर्म योग निष्काम ।
विरे त्यात सकाम । तेणे शांती धाम ॥ ९२ ॥
नित्य नामाचा ध्यास । आनंद सहवास ।
तेच हवे आत्म्यास । पांडुरंग सांगे खास ॥ ९३ ॥
घेता नामाचा श्वास । आनंद सहवास ।
आनंद शोधण्यास । जगदीश दारास ॥ ९४ ॥
नित्य नाम भजता । जडे आनंद साठा ।
तेणे अमृत वाटा । पांडुरंग त्राता ॥ ९५ ॥
नामे हांक मारता । उभा राहे जगत्त्राता ।
तोच ठरे रक्षणकर्ता । तेणे आनंद चित्ता ॥ ९६ ॥
येता जाता घेता नाम । तेणे साधे निष्काम ।
तेणे भगवंत मुक्काम । आनंद शांती धाम ॥ ९७ ॥
विसरू नये नामास । हाच असावा ध्यास ।
घेता नामाचा घास । होती चिंता क्लेश र्हास ॥ ९८ ॥
नाम येता मुखावर । आपण येतो भानावर ।
तेणे कुकर्मे टळणार । सुफळे मिळणार ॥ ९९ ॥
नामाचे नाद घुमवा । दुसर्यांस ऐकवा ।
आनंद कण वाटावा । भगवंत तोषावावा ॥ १०० ॥
नित्य नाम वदा । नित्य नाम वदा ।
तेणे आनंद सर्वदा । तोषे श्रीरंग सर्वदा ॥ १०१ ॥
नित्य नाम भजा । नित्य नाम भजा ।
भय चिंता न काळजा । तेणे दुःख वजा ॥ १०२ ॥
नित्य नाम आळवा । आळस घालवावा ।
यत्न आचरावा । भगवंत तोषवावा ॥ १०३ ॥
नामावर प्रपंच सोपा । हाच मार्ग सोपा ।
तेणे परमार्थ सोपा । गुरू सांगे मार्ग सोपा ॥ १०४ ॥
राहाता नित्य नामात । नारायण प्रकटतात ।
लक्ष्मी पाऊले उमटतात । पांडुरंग वदतात ॥ १०५ ॥
नित्य नाम वदावे । नारायणा तोषवावे ।
आत्म्यास तोषवावे । पांडुरंग मार्ग दावे ॥ १०६ ॥
नित्य नाम भजण्यात । शंका कुशंका विरतात ।
त्यांच्या निरसनात । आनंद चित्तात ॥ १०७ ॥
नामात भरला अर्थ । तेणे प्रपंच परमार्थ ।
खरा जीवनाचा अर्थ । तेणे स्वार्थ परमार्थ ॥ १०८ ॥
नामाने आळवा नाम । पांडुरंग नाम ।
सहज सोपे नाम । न करावे लागे मुद्दाम ॥ १०९ ॥
नामात होता रममाण । विसरता देहभान ।
तेणे खरे खुरे ज्ञान । पळुन जाते अज्ञान ॥ ११० ॥
नामाच्या प्रकाशात । अज्ञान लुप्त होतात ।
ज्ञान किरण तेजात । वृत्ती संतोषतात ॥ १११ ॥
येता नाम मुखावर । हरी लुब्ध त्यावर ।
तेणेच हरी भेटणार । चिंता क्लेश हरणार ॥ ११२ ॥
नित्य नामात रहाता । सहज भावे जगता ।
आनंद वृत्तीने जगता । कधी न कंटाळता ॥ ११३ ॥
नित्य नाम वदा । हरी स्वये बोले सदा ।
तेणे संतोषे सदा । भेटे आनंद देण्या सदा ॥ ११४ ॥
नित्य भजा नाम । सदाशिव मुक्काम ।
सोडून कैलासधाम । शोधे भक्तधाम ॥ ११५ ॥
नाम भजता हरघडी । ऐसा भक्त आवडी ।
भगवंत मार्ग काढी । भक्तां शोधुन काढी ॥ ११६ ॥
नाम घेता भगवंताचे । तेणे भय न चिंतेचे ।
मार्ग शांती समाधानाचे । ऐकावे पांडुरंगाचे ॥ ११७ ॥
मुखे भजता गजानन । तेणे चिंता पलायन ।
तेणे शांती समाधान । तेणे स्फुर्ती चैतन्य ॥ ११८ ॥
गजानन नामात । संकटे घाबरतात ।
मार्ग सुकर होतात । आनंद क्षण लाभतात ॥ ११९ ॥
नामाच्या चिंतनात । चिंता पळतात ।
समाधान चित्तात । आनंद पुढ्यात ॥ १२० ॥
ऐसे नाम आळवावे । भगवंताने ऐकावे ।
त्याचे चित्त भुलावे । भक्तघर शोधावे ॥ १२१ ॥
नाम भजावे नाम । सहज सोपे नाम ।
न मोजावे लागे दाम । कलीयुगी श्रेष्ठ नाम ॥ १२२ ॥
नाम ज्याच्या मुखाला । कली घाबरे त्याला ।
कली शरण नामाला । विसरू नका नामाला ॥ १२३ ॥
चिंतेच्या चिंतनात । चिंता येते पुढ्यात ।
भगवंताच्या नामात । भगवंत पुढ्यात ॥ १२४ ॥
नामे टळतो अहंकार । तेणे निराकार साकार ।
भवचिंता सरणार । आनंद मिळणार ॥ १२५ ॥
राहाता नामात सदा । तेणे संतोषतो ‘सदा’ ।
निवांत मिळतो सदा । पाठीराखा ठरे ‘सदा’ ॥ १२६ ॥
नाम घ्यावे कुणाचे ? । ऐसे न विचारायचे ।
महत्व आहे श्रद्धेचे । बोल अनुभवाचे ॥ १२७ ॥
नामाचे होता दास । तेणे तुटे भवपाश ।
भगवंत दारास । येतो विनासायास ॥ १२८ ॥
दास होता नामाचे । न व्हाल दास कुणाचे ।
भगवंतही दास नामाचे । ऐसे महत्व नामाचे ॥ १२९ ॥
दास व्हावे नामाचे । ऐका बोल आत्म्याचे ।
विरुद्ध ऐकण्याचे । हीत न व्हावयाचे ॥ १३० ॥
राहाता तुम्ही नामात । आत्म्याच्या संपर्कात ।
त्याचे बोल ऐकण्यात । सत्कर्मे घडतात ॥ १३१ ॥
बोला नाम पुष्कळ । तेणे कळे सकळ ।
नको निंदा वायफळ । नामच सांगे सकळ ॥ १३२ ॥
घेता नाम अगणिक । सोपे होते गणित ।
कोडी उकलतात । नाना प्रसंग टळतात ॥ १३३ ॥
नामाशी नाते जडता । दूर होते जडता ।
तेणे भगवंताचा पत्ता । सहज शोधुन काढता ॥ १३४ ॥
नामात होता धुंद । तेणे दरवळे सुगंध ।
शोधण्या नाम सुगंध । निघे भगवंत वृंद ॥ १३५ ॥
दरवळता नाम सुगंध । तेणे भगवंत धुंद ।
हुडकण्यात तो धुंद । देहभानाची न शुद्ध ॥ १३६ ॥
नामाच्या जयघोषात । भगवंत प्रकटतात ।
जयघोषे ते तोषतात । सदा भक्तां सांगतात ॥ १३७ ॥
नामे तोषतो भगवंत । तेणे तोषतो भक्त ।
नामाच्या सान्निद्ध्यात । सर्वच तोषतात ॥ १३८ ॥
नामाच्या ठेवीवर । व्याज वाढे सत्वर ।
खर्चिले तरी वाढणार । अगणित होणार ॥ १३९ ॥
नुसत्या नामोच्चारात । सर्व विद्या प्रकटतात ।
विविध प्रसंगात । उपयुक्त ठरतात ॥ १४० ॥
नामच शिकवे योग । तेच शिकवे विनियोग ।
तेणे प्रारब्धभोग । भोगता तुम्ही सहज ॥ १४१ ॥
सहजगता नामात । सहजगत्या पुढ्यात ।
नको अवडंबरात । नाम सांगे प्रत्यक्षात ॥ १४२ ॥
नाम भजता अक्षय । तेणे आनंद अक्षय ।
तेणेच होता निर्भय । वरदान अभय ॥ १४३ ॥
नाम घेता अक्षय । कधी न होई क्षय ।
न होणार कधी व्यय । ऐसे नाम अक्षय ॥ १४४ ॥
अक्षय नामात । अक्षय पुढ्यात ।
क्षय न कधी त्यात । नामाच्या अक्षयात ॥ १४५ ॥
ऐसे नाम गजानन । जीव जातो उद्धरून ।
करता नामस्मरण । शांती समाधान ॥ १४६ ॥
नामे तोषे गजानन । मनोमनी प्रसन्न ।
अभय वरदान । देती गजानन ॥ १४७ ॥
मुखे म्हणा गजानन । करा कर्तव्य पालन ।
प्रपंचात राहुन । निरासक्त होऊन ॥ १४८ ॥
गजानन गजानन । ऐसे करता नामस्मरण ।
चमत्कृतीमय जीवन । टाळाल प्रसंग दारूण ॥ १४९ ॥
नामे करता प्रपंच । लाभे नाम कवच ।
जरी अवघड प्रपंच । होई सहज सोपा प्रपंच ॥ १५० ॥
नामे दूर पळे गर्व । नामे पळे अहंभाव ।
नामे जागृत दयाभाव । सत्कृत्यास वाव ॥ १५१ ॥
व्हावे नामात रममाण । हेच जीवनी शहाणपण ।
तेणे मन प्रसन्न । मन न कधी उद्विग्न ॥ १५२ ॥
नामाने होता सावध । न कधी बेसावध ।
नामाने तत्व बोध । नामाने आत्मबोध ॥ १५३ ॥
सावध होतो नामात । राहे अनुसंधानात ।
उपयुक्त रक्षणात । वेळ प्रसंगात ॥ १५४ ॥
नामाची ऐशी किमया । नाम न जाई वाया ।
नामाचा करता धावा । भगवंत उभा राहावा ॥ १५५ ॥
नाम जीवनी उपयुक्त । सोपे साधन श्रेष्ठ ।
तेणे भाव उत्कट । जागृत होतात ॥ १५६ ॥
नामाची असता साथ । न राहे कुणी अनाथ ।
भेटतो सत्वर नाथ । करण्या प्रसंगावर मात ॥ १५७ ॥
नामाच्या संगतीत । वृत्ती आनंदतात ।
जीव रमे शांतीत । तेणे राहे सदोदीत ॥ १५८ ॥
नाम घ्यावे नाम घ्यावे । भगवंतास आळवावे ।
ऐसे नाम पुकारावे । स्वये भगवंताने यावे ॥ १५९ ॥
भगवंत भुलतो नामाला । न कंटाळे नामाला ।
नामातच भेटेन तुला । सांगे भगवंत भक्ताला ॥ १६० ॥
नामात रममाण व्हावे । चिंता क्लेश टाळावे ।
सदा आनंदी राहावे । जीवन सार्थक करावे ॥ १६१ ॥
नामाच्या सातत्यात । वृत्ती आनंदतात ।
तेणेच सत्कर्मे घडतात । कुकर्मे टळतात ॥ १६२ ॥
नाम महिमा अगाध । न कशाचा बाध ।
आनंद निर्विवाद । नामातच होतो बोध ॥ १६३ ॥
नामाने भाग्य उजळते । पदोपदी हे पटते ।
प्रारब्ध सुसह्य होते । संत बोल खरे ठरते ॥ १६४ ॥
संत तरले नामावर । भरंवसा ठेवे नामावर ।
मात केली प्रसंगावर । म्हणे हाच नामाचा सार ॥ १६५ ॥
नामात आपण रमावे । देहभान विसरावे ।
सुखदुःखा महत्व न द्यावे । नामावरच जगावे ॥ १६६ ॥
नामाच्या सान्निद्ध्यात । सुख दुःखे न उरतात ।
न कधी जाणवतात । प्रारब्ध भोग सुसह्य होतात ॥ १६७ ॥
नाम घ्यावे भगवंताचे । व्हावे आपण नामाचे ।
नामाने अनेकांचे । सार्थक केले जीवनाचे ॥ १६८ ॥
येता जाता नामस्मरण । तेणे भगवंत दर्शन ।
तेणे शंका निरसन । संत सांगती निक्षुन ॥ १६९ ॥
नाम स्मरावे केव्हाही । नाम स्मरावे कुठेही ।
तेणे भगवंत कुठेही । दिसे भगवंत केव्हाही ॥ १७० ॥
नामात मिळे आनंद । तेणे भेटे परमानंद ।
तेणे सत् चित् आनंद । तेणे सच्चिदानंद ॥ १७१ ॥
नाम घ्यावे भगवंताचे । होऊन रहावे त्याचे ।
न भय चिंता काळजीचे । तेणे क्षण आनंदाचे ॥ १७२ ॥
नित्य नामात आनंद । तेणे आत्म्यास आनंद ।
चराचरतला आनंद । करतो मना धुंद ॥ १७३ ॥
नाम स्मरा, नाम स्मरा । भवदुःख हरा, चिंता हरा ।
आनंद खरा, स्वये घरा । मिळे खरा, नामात सारा ॥ १७४ ॥
नामात कळे पाप पुण्य । इतुके सोपे साधन ।
भरंवसा त्यावर ठेवुन । कित्येक गेले तरून ॥ १७५ ॥
नामाचे होता दास । तेणे राम दारास ।
रामाचे होता दास । तेणे रामदास ॥ १७६ ॥
दास होता नामाचे । दास होता रामाचे ।
राम दास त्याचे । राम नाम जपणार्याचे ॥ १७७ ॥
मुखे म्हणा रामनाम । अहर्निष रामनाम ।
तेणे साधे निष्काम । जेणे तोषे श्रीराम ॥ १७८ ॥
रामनाम भजावे । श्रद्धेने ते भजावे ।
तेणे चित्ता तोषावावे । जीवन सार्थक करावे ॥ १७९ ॥
रामनाम घ्यावे । कर्तव्य पालन करावे ।
अकर्ता भावे जगावे । अहंभाव विसरावे ॥ १८० ॥
मुखी असता रामनाम । विषयास लगाम ।
घाबरे काळकाम । तेणे भक्तीचे धाम ॥ १८१ ॥
रामनाम भजा । रामनाम भजा ।
नष्ट होई भाव दुजा । लहान, थोर, खुजा ॥ १८२ ॥
रामनाम आळवता । चिंता काळजी घालवता ।
तेणे प्रसन्न करता चित्ता । जीवन सार्थक करता ॥ १८३ ॥
रामनाम भजण्यात । शीळा उद्धरे त्यात ।
रामनामे सुसह्य होतात । जरी भोग भोगतात ॥ १८४ ॥
रामनाम भजावे । रामनामी तल्लीन व्हावे ।
सभोवताल विसरावे । जरी त्यात रहावे ॥ १८५ ॥
भजा भजा रामनाम । तेणे श्रीराम मुक्काम ।
चिंता काळजीस रामराम । तेणे समाधान मुक्काम ॥ १८६ ॥
रामाचे होता दास । चिंता काळजी र्हास ।
नामाचा एकेक श्वास । तेणे भगवंताचा वास ॥ १८७ ॥
राम दास कुणाचा ? । राम दास नामाचा ।
राम दास त्याचा । जो सदा रामाचा ॥ १८८ ॥
नामाचे दास होण्यात । रामच दास होतात ।
सारा प्रपंच करतात । भवताप ते हरतात ॥ १८९ ॥
नामाचे दास व्हावे । आत्म्याचे बोल ऐकावे ।
वृत्तीचे तोल सावरावे । तेणे समतोल साधावे ॥ १९० ॥
पळें पळें नामात । पळें पळें तोषतात ।
चिंता पळे त्यात । रहाता आनंदात ॥ १९१ ॥
पळें पळें नाम भजता । पळें पळें आनंद चित्ता ।
चिंता काळजी घालवता । सहजभावे जगता ॥ १९२ ॥
नामाचा एकेक पळ । वाढवे मनोबळ ।
चिंता काळजी सकळ । त्वरित काढे पळ ॥ १९३ ॥
नामाच एकेक क्षण । करे मन प्रसन्न ।
तेणे चित्ता समाधान । शांतीस सदा स्थान ॥ १९४ ॥
नामाचा सहवास । तेणे पापाचा र्हास ।
पुण्य येते उदयास । नाम उद्धरे जीवास ॥ १९५ ॥
नुसत्या नामोच्चारात । उच्चार प्रभावी होतात ।
प्रभावी उच्चारात । सर्व थक्क होतात ॥ १९६ ॥
नामाची ऐशी शिकवण । तेणे सदाचरण ।
तेणे सत्शील वर्तन । तेणे सुसंगत जीवन ॥ १९७ ॥
नामाची असता सोबत । तेणे सत्संग सोबत ।
कठिण प्रसंगात । भगवंत सोबत ॥ १९८ ॥
नामजप करावे । श्रेष्ठ तप मानावे ।
भगवंताचे ऐकावे । भगवंता तोषवावे ॥ १९९ ॥
नामाचे दास होण्यात । लौकीक विसरतात ।
कर्तव्यकर्मे करतात । भगवंताचे होतात ॥ २०० ॥
नाम सहवासात । लौकीक दारात ।
पाहुणा मानतात । पळभराचा म्हणतात ॥ २०१ ॥
नामाने जे जे कळते । ते ते मनास पटते ।
तेणे मनासारखे होते । चित्ता शांती लाभते ॥ २०२ ॥
नामे होतो साकार । जरी निराकार ।
नामेच तोषणार । सदा भक्ता भेटणार ॥ २०३ ॥
नाम घ्या नाम घ्या । तेणे प्रारब्ध भोगा ।
शांती समाधाने जगा । तेणे न भय काळजा ॥ २०४ ॥
नाम घ्या हो, नाम घ्या हो । तेणे भवाब्धी तरा हो ।
तेणे पैलतीर गाठा हो । जीवन सार्थक करा हो ॥ २०५ ॥
नामात गुंतवावे चित्त । तेणे लाभे मनःस्वास्थ्य ।
नामातले खरे तथ्य । कळे नामात राहण्यात ॥ २०६ ॥
नामात राहता तुम्ही । विसरता तुम्ही आम्ही ।
काही न करत ‘मी’ । नामात जाणता तुम्ही ॥ २०७ ॥
नाम जोडते संबंध । तेणे मिळतो आनंद ।
त्यातच होता धुंद । जमवता संत वृंद ॥ २०८ ॥
नामस्मरण करण्याते । मोहमाया कळते ।
मोहमाया न जाळते । नामच उपयुक्त ठरते ॥ २०९ ॥
वृथा नको वटवट । नामाची करा खटपट ।
त्यातच विसराल देहकष्ट । संत बोल ठरे सत्य ॥ २१० ॥
नाम येता मुखात । वटवट थांबे क्षणात ।
वटवट न उपयुक्त । हेच पटते नामात ॥ २११ ॥
नको वायफळ बडबड । तेणे होते गडबड ।
नामाची करता धडपड । काही न वाटे अवघड ॥ २१२ ॥
नामाचे बोला बोल । तेणे सावरेल तोल ।
तेणे जीवन समतोल । पटते मनावर खोल ॥ २१३ ॥
नामाचा एकेक क्षण । धुंद करतो विलक्षण ।
आनंदाचा एकेक कण । येतो आपणहुन ॥ २१४ ॥
नाम मधुर गोड । त्याचा सहवास गोड ।
नामाची मिळता जोड । तेणे भगवंताची जोड ॥ २१५ ॥
नामे जोडता एकेक । तेणे जडे भाव ऐक्य ।
नामाने शत्रु एकेक । करे सोयरीक ॥ २१६ ॥
नामात कळते कित्येक । नामात मिळते कित्येक ।
नामात विरे सुखदुःख । तेणे आनंद शिल्लक ॥ २१७ ॥
नामाचे न मोजमाप । तेच कळे आपोआप ।
अमाप नामाचे अमाप । तेणे सरती भवताप ॥ २१८ ॥
नामात तुम्ही असता । भवतापास विसरता ।
आनंदास मिळवता । शांती समाधान चित्ता ॥ २१९ ॥
जितुके तुम्ही नामात । तितुका आनंद पुढ्यात ।
जितुके प्रपंचात । तितुके भवतापात ॥ २२० ॥
भवाचा ताप होता । नामास आळवता ।
परी आधी नाम आळवता । न भवताप चित्ता ॥ २२१ ॥
प्रपंचातली ओढ । हव्यासास ओढ ।
नामस्मरणातली ओढ । भगवंताची जोड ॥ २२२ ॥
प्रपंचातली जाणीव । तीच दावते उणीव ।
नामात रमवावा जीव । नामालाच आपली कीव ॥ २२३ ॥
आधी विचार नामाचा । मग करा प्रपंचाचा ।
नामानेच जगण्याचा । निश्चय करा मनाचा ॥ २२४ ॥
नामाची करता सोय । नामच करते सोय ।
नामात रमवता जीव । नामच रमवते जीव ॥ २२५ ॥
नामाचा एकेक पळ । तेणे बोध सकळ ।
नामात मिळे सुफळ । न कधी विफळ ॥ २२६ ॥
नामानेच जगण्यात । आनंदे जगण्यात ।
नामाने आनंदात । आनंदे नामात ॥ २२७ ॥
नामात रमा । नामात रमा ।
उपयुक्त कामा । पोहोचण्या मुक्कामा ॥ २२८ ॥
रमा रमा नामात । तेणे आनंद पुढ्यात ।
रमा रमा आनंदात । तेणेच नाम मुखात ॥ २२९ ॥
नामात तल्लीन असता । तेणे भय न चित्ता ।
आनंद वृत्तीचा साठा । चित्त शांत असता ॥ २३० ॥
नामात भेटे पांडुरंग । तेणे जीवन सुसंग ।
तेणे टळे कुसंग । जडे सदा सत्संग ॥ २३१ ॥
नामातला एकेक क्षण । देतो आनंद विलक्षण ।
चिंता क्लेश पलायन । होता नामात रममाण ॥ २३२ ॥
सुखाच्या हव्यासात । चिंता क्लेश पुढ्यात ।
नामाच्या हव्यासात । समाधान पुढ्यात ॥ २३३ ॥
नामाच्या सान्निध्यात । सत्कर्मे घडतात ।
अहंभाव लुप्त होतात । कर्तव्य भावे जगतात ॥ २३४ ॥
भगवंताच्या नामात । वृत्ती आनंदतात ।
चिंता क्लेश टळतात । समाधाने जगतात ॥ २३५ ॥
करता नामाचे स्मरण । भगवंतास आमंत्रण ।
नामावर गेले तरून । भगवंत सांगे निक्षुन ॥ २३६ ॥
नामाची नको शंका । नामच करते दूर शंका ।
नामात भेटे पाठीराखा । तोच उपयुक्त खरा सखा ॥ २३७ ॥
नामावाचुन जगणे । जेणे जीवंत मरणे ।
नामानेच जगणे । मरणोत्तर जगणे ॥ २३८ ॥
नामात जीव रमवा । अंतरात्म्यास तोषवा ।
आनंद आपला व्हावा । जीव त्यात रमवा ॥ २३९ ॥
नामात जीव रमता । तेणे येते प्रसन्नता ।
सभोवताली असता । स्थिर चित्ते वागता ॥ २४० ॥
नामातच सर्व मिळते । हे नामानेच कळते ।
नामानेच तृप्ती होते । अतृप्त न रहाते ॥ २४१ ॥
नामात सदा डुंबावे । मलीन घालवावे ।
ताजे तवाने रहावे । प्रसन्नतेने जगावे ॥ २४२ ॥
नामात डुंबत रहाता । एकचित्त साधता ।
तेणे येते एकसूत्रता । तेणे सुसंगतता ॥ २४३ ॥
डुंबुन रहावे नामात । आनंद मिळे नामात ।
थकवा उतरे क्षणात । विरंगुळा लाभे त्यात ॥ २४४ ॥
डुंबुन रहा हो नामात । हेच सांगती साधुसंत ।
राहुन प्रपंचात । रहाल आनंदात ॥ २४५ ॥
नामावर तरले सारे । अज्ञानी बापडे बिचारे ।
नामात जे जे रमणारे । ते ते ज्ञानी झाले सारे ॥ २४६ ॥
नामात होते ज्ञान । पळुन जाते अज्ञान ।
नामात होता रममाण । ज्ञानाची सापडे खाण ॥ २४७ ॥
नाम घ्यावे एकांतात । तेणे भय न चित्तात ।
मलीनता न मनात । प्रसन्नता चित्तात ॥ २४८ ॥
नामात गुंतविता चित्त । न गुंते ते विषयात ।
नामच उपयुक्त । ठरे सर्व प्रसंगात ॥ २४९ ॥
नामाने जे जे मिळते । विषयात न मिळते ।
विषयात सर्व जाते । नामात सर्व मिळते ॥ २५० ॥
नामात गुंतवा चित्ता । चिंता उद्भवता ।
नामात तल्लीन होता । चिंतेस विसरता ॥ २५१ ॥
चित्त गुंतवा नामात । चिंता पळते क्षणात ।
फक्त रहाता नामात । तेणे रहाता आनंदात ॥ २५२ ॥
चिंता जाळते चित्तास । हेच येते अनुभवास ।
परी राहाता नामास । अनुभवाल आनंदास ॥ २५३ ॥
नामातले स्वेदबिंदु । तारतात भवसिंधु ।
सगे सोयरे बंधु । म्हणे नामास वंदु ॥ २५४ ॥
नामास आळवावे । नामाचेच ऐकावे ।
साधे भाबडे रहावे । तेणे पैलतीरी जावे ॥ २५५ ॥
रमा रमा नामात । तल्लीन व्हा नामात ।
नामाचे नाद ऐकण्यात । रहाल आनंदात ॥ २५६ ॥
नामात जीव रमवा । अनुसंधान टिकवा ।
तेणे आनंद मिळवा । तेणे आनंद टिकवा ॥ २५७ ॥
नामाच्या अनुसंधानात । सत्कर्मे घडतात ।
सत्कर्मे आचरणात । शुभाशिष मिळतात ॥ २५८ ॥
नामात तुम्ही राहाता । आत्म्याचे बोल ऐकता ।
तैसे तुम्ही आचरता । आत्म्यास संतोषता ॥ २५९ ॥
नामात तुम्ही रहावे । आत्म्याचेच ऐकावे ।
मनाचे न ऐकावे । आत्म्यास तोषवावे ॥ २६० ॥
रमा रमा नामात । रहा भोळ्या भावात ।
तैसे आचरणात । परमेश्वराचे होतात ॥ २६१ ॥
नामाचे होण्यात । मनोविकार टळतात ।
सद्विचार प्रकटतात । सत्कर्मे घडतात ॥ २६२ ॥
नामाचे व्हावे दास । तेणे विकाराचा र्हास ।
थारा सुविचारास । सत्कर्मे आचरणास ॥ २६३ ॥
नामावर विसंबावे । आधार मानावे ।
नामानेच जगावे । जीवन सार्थक करावे ॥ २६४ ॥
भगवंताच्या नामात । त्याच्या जयघोषात ।
सुखदुःखे विरतात । आनंद क्षण लाभतात ॥ २६५ ॥
नामाचे आपण व्हावे । नामात आपण रमावे ।
नामावरच सोपवावे । आनंदात रहावे ॥ २६६ ॥
आपण कुणाचे व्हावे ? । नामाचेच व्हावे ।
प्रपंचात रमावे । परी नामास न विसरावे ॥ २६७ ॥
नामास विसरण्यात । अहंभावे जगतात ।
अहंकार होण्यात । विकार बळावतात ॥ २६८ ॥
नाम म्हणजे काय ? । भगवंताची सोय ।
परमार्थाची सोय । तेणे उद्धरतो जीव ॥ २६९ ॥
नामास गुरू मानावे । गुरू बोल ऐकावे ।
तैसेच आचरावे । आत्म्यास तोषावे ॥ २७० ॥
नामाच्या जयघोषात । आत्मास तोषतात ।
मनःशांतीने जगतात । आनंदे रहातात ॥ २७१ ॥
नामाने मुख्य मिळते । मनःशांती मिळते ।
तीच आधार ठरते । मन प्रसन्न रहाते ॥ २७२ ॥
नामाने आळवावे । तेणे एकाग्र व्हावे ।
जे जे बोल ऐकावे । ते चित्ता ठसवावे ॥ २७३ ॥
फक्त ऐकता नामाचे । तेणे होता सर्वांचे ।
तेणे क्षण भाग्याचे । होतात अनेकांचे ॥ २७४ ॥
काय आहे माझे ? । फक्त माझे ओझे ।
नाम म्हणण्यात माझे । हलके होते बोजे ॥ २७५ ॥
जितुके नाम आळवाल । ‘मी’ स तितुका घालवाल ।
‘मी’ स पार विसराल । त्यालाच आपला कराल ॥ २७६ ॥
नामाने अनेकांची । सोय केली परमार्थाची ।
खोडी जिरली स्वार्थाची । गोडी लागली परमार्थाची ॥ २७७ ॥
नामाने सर्व जोडता । मोहपाश तोडता ।
मोहास मागे टाकता । पाऊल पुढे टाकता ॥ २७८ ॥
नामाच्या बंधनात । बंधने तुटतात ।
पुढिल मुक्कामी जाण्यात । दुःखी न होतात ॥ २७९ ॥
नामास आधार मानता । सर्व प्राप्त करता ।
नामच मागे ठेवता । जरी पुढे जाता ॥ २८० ॥
नामाचेच होण्यात । माझे माझे विसरतात ।
तुझे तुझे म्हणण्यात । सर्व प्राप्त करतात ॥ २८१ ॥
माझे माझे म्हणण्यात । बोजे वाढवतात ।
नामाने जगण्यात । हलके करतात ॥ २८२ ॥
नामाने जे मिळते । ती ‘मी’ ने न मिळते ।
हेही नामातच कळते । नामाचे महत्व पटते ॥ २८३ ॥
नामाचे महत्व कळता । ‘मी’ स विसरता ।
तेणे नामास आळवता । नामानेच जगता ॥ २८४ ॥
नामाने ‘मी’ जातो । ‘तो’ सहज पुढे येतो ।
तोच आधार ठरतो । तोच उपयुक्त ठरतो ॥ २८५ ॥
नामजप करण्यात । भवसागर तरतात ।
संत तरले नामात । आपणही तरावे त्यात ॥ २८६ ॥
वाल्याने ‘राम’ भजला । तेणे वाल्या तरला ।
लुटारू तपस्वी झाला । नामानेच उद्धरला ॥ २८७ ॥
नाम असता मुखावरी । वृत्ती होते परोपकारी ।
आशीष वरचेवरी । जे उपयुक्त संसारी ॥ २८८ ॥
जे जे नामात रमले । नरदेहाचे सोने झाले ।
जे जे विषयात रमले । चिंता क्लेशात घेरले ॥ २८९ ॥
नामासक्त होण्यात । तरता भवसागरात ।
कामासक्त होण्यात । डुबता भवसागरात ॥ २९० ॥
नामासक्त असावे । कामासक्त नसावे ।
जीवास उद्धरावे । जीवन सार्थक करावे ॥ २९१ ॥
नामाने प्रेरणा मिळतात । त्याच आधार ठरतात ।
त्या येता आचरणात । आनंदक्षण लाभतात ॥ २९२ ॥
ऐसा नामजप करावा । भगवंत प्रसन्न व्हावा ।
ऐसा करा त्याचा धांवा । स्वयेच जवळ यावा ॥ २९३ ॥
नाम श्रद्धेने भजावे । नाम नीष्ठेने भजावे ।
नामानेच त्याचे व्हावे । त्याचेवरच सोपवावे ॥ २९४ ॥
प्रपंचाचा ताप भारी । हा जीव बेजार भारी ।
परी असता नामावरी । मात करता प्रसंगावरी ॥ २९५ ॥
विचार करावा नामाचा । नको नुसत्या प्रपंचाचा ।
नामाने प्रसंग तरण्याचा । चिंतेने प्रसंग पोळण्याचा ॥ २९६ ॥
नाम आळवा हो नाम । भगवंताचे सोपे नाम ।
कुठचेही अवघड काम । सहज होते सोपे काम ॥ २९७ ॥
श्रद्धेने नामजप करता । स्वानुभवे जगता ।
खात्रीने पाऊल टाकता । आत्म्याचे आवाज ऐकता ॥ २९८ ॥
कुठचेही क्षण असु द्या । नामात जीव रमु द्या ।
नका म्हणु उद्या उद्या । सवड न मिळे उद्या ॥ २९९ ॥
नाम जपावे आजच । निश्चय करावा हाच ।
उपयुक्त तुम्हा नामच । आत्म्यासही हवे नाम ॥ ३०० ॥
नामाचे अनुसंधान । तेणे जोडता संधान ।
नामात जाल तरून । स्वानुभव पहावा घेऊन ॥ ३०१ ॥
नामात काढता एकेक पळ । तेणे ज्ञान सकळ ।
अज्ञान स्वये काढे पळ । दिसता ज्ञानाची मशाल ॥ ३०२ ॥
हाती घेता ज्ञान मशाल । तेणे सत्पथ पहाल ।
नामाने करता वाटचाल । मुक्कामी तुम्ही पोचाल ॥ ३०३ ॥
नामात वेळ घालवता । चिंता क्लेश घालवता ।
क्षणात आनंद मिळवता । चिरकाल तो टिकवता ॥ ३०४ ॥
नामाचा महिमा अगाध । त्याचा न कुणा बाध ।
नामात मिळवता अगाध । नामाने नाम अगाध ॥ ३०५ ॥
आम्ही होणार नामाचे । फुकट न खाणार कुणाचे ।
बोजे न होणार कष्टाचे । चीज होईल कष्टाचे ॥ ३०६ ॥
नामाचे आपण होण्यात । नामाशी नाते जोडण्यात ।
‘मी’ पळतो तत्क्षणात । जीव रमतो नामात ॥ ३०७ ॥
नामाचे कार्य रमविण्याचे । दुसर्या आनंद देण्याचे ।
मनःशांतीने जगविण्याचे । कार्य आहे नामाचे ॥ ३०८ ॥
नामाने भगवत् प्राप्ती । हीच नामाची ख्याती ।
नामाशी होता नाती गोती । अनेक कुळे उद्धरती ॥ ३०९ ॥
नामाचा हुकुमी एक्का । विजय होतो पक्का ।
नामाचा लागता शिक्का । कार्यभाग होतो पक्का ॥ ३१० ॥
नामाची साथ असता । कार्यभाग साधता ।
तेणे प्रसन्नता चित्ता । आनंदाने जगता ॥ ३११ ॥
साथ असावी नामाची । सोबत असावी त्याची ।
तेणे चिंता न भयाची । वाटचाल सुखशांतीची ॥ ३१२ ॥
नामाची गुरूकिल्ली लाभता । अनेक कुलुपे उघडता ।
भगवंताच्या जवळ जाता । त्याचेच होऊन राहाता ॥ ३१३ ॥
नामात दिसतो भगवंत । जो आहे सर्व व्याप्त ।
दिसतो विविध रुपात । खुण पटवतो क्षणात ॥ ३१४ ॥
नामात होता एकरूप । दिसे अरूप स्वरूप ।
तेच खरे स्वरूप । आनंदाचे स्वरूप ॥ ३१५ ॥
नाते जोडावे नामाशी । ते न ठेवणार उपाशी ।
नामाचा संबंध आत्म्याशी । नच नुसता पोटाशी ॥ ३१६ ॥
नामाच्या संपर्कात । आत्म्यास तोषतात ।
परमेश्वर चराचरात । सर्वांभूती दिसतात ॥ ३१७ ॥
जे जे मिळते नामात । ते न मिळे कशात ।
मुख्य मिळते नामात । सहज मिळते परसात ॥ ३१८ ॥
नामाचा संबंध ईशाशी । कळते रहाता नामाशी ।
‘तो’ स्वयेच येतो दाराशी । शिदोरी मागण्यासी ॥ ३१९ ॥
नामाची शिदोरी ऐसी । भगवंतही भुले त्यासी ।
गोडी लागली त्यासी । वरचेवर मागे भक्तासी ॥ ३२० ॥
नामाच्या शिदोरीत । अनेक तृप्त होतात ।
भगवंतही लुब्ध होतात । पुन्हां पुन्हां मागतात ॥ ३२१ ॥
शिदोरी जाडी भरडी । परी नामामुळे गोडी ।
भगवंतही न सोडी । ती चाखण्या शोधुन काढी ॥ ३२२ ॥
शिदोरी असता नामाची । वेळ न उपासमारीची ।
ढेकर येते तृप्तीची । ती खुण समाधानाची ॥ ३२३ ॥
नामाच्या शिदोरीवर । सर्व तरले आजवर ।
कुणीही तरणार । नामाच्या शिदोरीवर ॥ ३२४ ॥
भगवंत भुले नामावर । नाम त्यास प्रिय फार ।
हांक मारता धावणार । नामानेच पटणार ॥ ३२५ ॥
नामाची शिदोरी करावी । त्याची वाट पहावी ।
शिदोरी उष्टी करावी । हीच ईच्छा असावी ॥ ३२६ ॥
नामाच्या शिदोरीला । भगवंतही भुलला ।
शिदोरी खावयाला । भक्ताच्या घरी आला ॥ ३२७ ॥
नामाची शिदोरी सर्वांची । कधी न एकट्याची ।
सोय होते अनेकांची । खुण पटते नामाची ॥ ३२८ ॥
नामस्मरण करावे । त्यातच तल्लीन व्हावे ।
नामानेच तृप्त व्हावे । नामानेच अनुभव घ्यावे ॥ ३२९ ॥
नामाचा ऐसा अनुभव । तेणेच तरता भव ।
नामाने होता निर्भय । हाच नाम अनुभव ॥ ३३० ॥
नामात होता रममाण । विसरता भूक तहान ।
वेळेचेही न भान । होता नामात रममाण ॥ ३३१ ॥
भगवंतास काय हवे ? । त्यास नामच हवे ।
नामच मागतो स्वये । खुण पटवतो स्वये ॥ ३३२ ॥
नामाची शिदोरी बाळगा । तेणेच भरा खळगा ।
शिदोरीवरच जगा । शिदोरीचा अनुभव घ्या ॥ ३३३ ॥
नामाच्या शिदोरीचे गाठोडे । अहो आहे मोठे केवढे ! ।
सर्वांना वाढता वाढे । ऐसे नामाचे गाठोडे ॥ ३३४ ॥
नाम शिदोरी गंमतीदार । वाढता ती वाढणार ।
न वाढता, कमी होणार । ऐसे कुठे नसणार ॥ ३३५ ॥
शिदोरी करा नामाची । सोय करा अनेकांची ।
अनुभुती तृप्ततेची । अनुभुती आशीषांची ॥ ३३६ ॥
नामाची शिदोरी असता । चिंता मुक्त असता ।
समाधानाने जगता । तृप्ततेने जगता ॥ ३३७ ॥
एक शिदोरी नामाची । भगवंताच्या आवडीची ।
हाव सुटली शिदोरीची । तृप्ती होते भगवंताची ॥ ३३८ ॥
सोपी शिदोरी नामाची । विना खटाटोपीची ।
जेणे प्रिय अनेकांची । खुद्द भगवंताची ॥ ३३९ ॥
जयघोष करा नामाचा । जयघोष करा रामाचा ।
नको विचार ‘मी’चा । सदा विचार रामाचा ॥ ३४० ॥
श्रीरामाच्या नामात । तरता तुम्ही प्रसंगात ।
बनता धिरोदात्त । कधी न भयभीत ॥ ३४१ ॥
बोल बोला रामाचा । जयजयकार करा त्याचा ।
जेणे क्षण भाग्याचा । होईल भजणार्याचा ॥ ३४२ ॥
पुरुषोत्तमाचा अवतार । सत्याचाच जयजयकार ।
असत्य न टिकणार । रामनामे लोपणार ॥ ३४३ ॥
श्रीराम श्रीराम म्हणा । तेणे सद्विचार मना ।
सत्कर्मे आचरणा । उपयुक्त उद्धरण्या ॥ ३४४ ॥
श्रीराम जयरामात । सद्विचार प्रकटतात ।
सत्कर्मे घडतात । कुकर्मे टळतात ॥ ३४५ ॥
जीव रमवा नामात । जीव रमवा नामात ।
तेणे निश्चयात । वेळप्रसंगात ॥ ३४६ ॥
राम राम मुखे म्हणा । तेणे येतो स्थिरपणा ।
तेणे समतोलपणा । उपयुक्त क्षणाक्षणा ॥ ३४७ ॥
मुखे म्हणा श्रीराम । मनात ठसवा श्रीराम ।
मनःचक्षुसही श्रीराम । दिसता सर्वत्र श्रीराम ॥ ३४८ ॥
श्रीराम प्रपंचातला । परी न गुरफटला ।
हा बोध नामाने झाला । नका विसरू नामाला ॥ ३४९ ॥
श्रीरामाच्या नामात । चतुर्मुखे दिसतात ।
भक्तीभाव प्रकटतात । भक्तीभावे जगतात ॥ ३५० ॥
जो रमतो नामात । तोच रमतो रामात ।
रामच दिसे प्रपंचात । राहातो आनंदात ॥ ३५१ ॥
रामाचा ध्यास बाळगा । खर्या अर्थाने जगा ।
होता नामाच गाजावाजा । होतो श्रीराम जागा ॥ ३५२ ॥
रामनाम भजावे । चौफेर श्रीराम पहावे ।
रामालाच सोपवावे । तैसेच आचरावे ॥ ३५३ ॥
श्रीराम भजण्यात । बंधुभाव प्रकटतात ।
तैसा येतो आचरणात । भगवंत संतोषतात ॥ ३५४ ॥
नामाचा असता सहवास । रामाचे होता दास ।
तेणे न स्त्री हव्यास । रहाता कर्तव्य कर्मास ॥ ३५५ ॥
रामनाम भजावे । कर्तव्य कर्म करावे ।
सर्व त्याचेच मानावे । प्रारब्ध सोपवावे ॥ ३५६ ॥
नामाने आळवावे । रामास संतोषावे ।
रामदर्शन व्हावे । जीवन सार्थक व्हावे ॥ ३५७ ॥
श्रीराम जयराम जयराम । श्रीराम जयराम जयराम ।
मुखी असुद्या रामनाम । श्रीराम जयराम जयराम ॥ ३५८ ॥
रामनाम भजा भजा । तेणे भय न काळजा ।
काळास म्हणतजा । नको नको तुझी ये जा ॥ ३५९ ॥
नको क्षण नामाविण । नको क्षण रामाविण ।
रामात होता रममाण । बेचैन रामाविण ॥ ३६० ॥
रामनामातला राम । दिसतो प्रत्यक्ष राम ।
ऐसे भजता रामनाम । गाठाल मुक्काम ॥ ३६१ ॥
राहाता रामनामात । आनंदाश्रु नयनात ।
दुःखाश्रु सरतात । सुखदुःखे विरतात ॥ ३६२ ॥
रामनाम जेथे । आनंद मुक्काम तेथे ।
रामस्वरूप तेथे । खरेखुरे दिसते ॥ ३६३ ॥
रामनाम भजा । चिंता काळजी वजा ।
दैन्य दुःख वजा । आनंदाची ये जा ॥ ३६४ ॥
रामाच्या नामात । पतिव्रतेस तोषतात ।
शुभाशिष मिळतात । उपयुक्त ठरतात ॥ ३६५ ॥
रामनाम म्हणता । संतोषते सीता ।
लक्ष्मणा संतोषता । दारी येतो हनुमंता ॥ ३६६ ॥
जेथे जेथे रामनाम । तेथे हनुमंत मुक्काम ।
भयभीत काळकाम । आनंद मुक्काम ॥ ३६७ ॥
रामनाम म्हणण्यात । शुद्ध हेतू मनात ।
सात्विक विचारात । पवित्र आचरणात ॥ ३६८ ॥
रामनाम भजावे । शुद्ध भाव जागे व्हावे ।
सर्वांभूती राम पहावे । प्रसन्नतेने जगावे ॥ ३६९ ॥
रामनामोच्चारात । शुद्ध पवित्र अंतरंगात ।
तेच येते आचरणात । सत्शीले जगतात ॥ ३७० ॥
रामनाम भजण्यात । शिवशक्तीही प्रकटतात ।
दुःख संहार करतात । जेथे जेथे प्रकटतात ॥ ३७१ ॥
रामाचा करता जप । तेणे हरतो भवताप ।
काळाचाही थरकाप । आनंद अमाप ॥ ३७२ ॥
रामनाम भजा । आनंद वृत्तीने जगा ।
सुखदुःखाच्या बेरजा । आपसुक वजा ॥ ३७३ ॥
रामनाम मुखे म्हणा । आनंद विलक्षण मना ।
स्वानुभव वदा जना । ऐसा तुम्हां येवो म्हणा ॥ ३७४ ॥
वदा वदा रामनाम । तेणे चौघांचा मुक्काम ।
आपल्याच घरी ठाम । उपयुक्त रामनाम ॥ ३७५ ॥
नामाचा सहवास । सुसह्य वनवास ।
प्रत्यक्ष रामास । आले अनुभवास ॥ ३७६ ॥
नामाचा करता नेम । लाभे भगवंत प्रेम ।
प्रकटतो श्रीराम । करतो मुक्काम ॥ ३७७ ॥
जो नामव्रत आचरी । तेणे दिसे धनुर्धारी ।
सोबत गदाधारी । तोच भवताप हारी ॥ ३७८ ॥
राम जन्मला राम । दशरथाचा तो राम ।
दशदिशांचा तो राम । ईच्छापूर्तीचा श्रीराम ॥ ३७९ ॥
रामजन्म जाहला । सर्वां आनंद झाला ।
भवताप हरण्याला । श्रीराम प्रकटला ॥ ३८० ॥
श्रद्धेने आळवा श्रीराम । दिसे मूर्तीमंत राम ।
पदोपदी स्मरता राम । जगण्यात वाटे राम ॥ ३८१ ॥
नामात असता लक्ष । काळकामाचे न भक्ष्य ।
नामाशी करता सख्य । राहाता हंसतमुख ॥ ३८२ ॥
नामाचे अनुसंधान । ठरते वरदान ।
भगवंत आपणहुन । करतो भक्त रक्षण ॥ ३८३ ॥
नामाचे व्हावे आपण । व्हावे त्यात रममाण ।
देहभान विसरून । करावे नामस्मरण ॥ ३८४ ॥
तल्लीन व्हावे नामात । एकरूप व्हावे नामात ।
पहाल भगवंत । एकरूप होण्यात ॥ ३८५ ॥
नामातली एकरूपता । प्रसन्न करते चित्ता ।
मनास प्रफुल्लता । नामानेच साधता ॥ ३८६ ॥
नामात तुम्ही रमता । साधता एकरूपता ।
त्यात रममाण होता । प्राप्त करता भगवंता ॥ ३८७ ॥
आम्ही नामाचे नामाचे । हेच सदा म्हणायचे ।
तेणे व्हावे भगवंताचे । न व्हावे दुसर्याचे ॥ ३८८ ॥
भगवंताचे नाम । शांती समाधान ठाम ।
तेणे चैतन्य धाम । सानंदस्वरूप धाम ॥ ३८९ ॥
नामाची महती । नामच दावे प्रचीती ।
नामात रमता अती । तेणे भगवत् प्राप्ती ॥ ३९० ॥
नामाचा असावा ध्यास । त्यात रमावे तास नि तास ।
तेणे भगवंतास । प्राप्त कराल हमखास ॥ ३९१ ॥
रंगा रंगा नामात । नामाने रंगा त्यात ।
रंगावे सर्वात । असुनी नामात ॥ ३९२ ॥
नामात होता रंग । रंगाने पहाता रंग ।
जीवनातले रंग । दावतो श्रीरंग ॥ ३९३ ॥
रंगा रंगा नामात । नामाच्या रंगात ।
रंग दिसे प्रत्यक्षात । विविध रूपात ॥ ३९४ ॥
रंग रंग नामाचा । तेणे प्रकाश ज्ञानाचा ।
नाश अज्ञानाचा । ऐसा प्रभाव नामाचा ॥ ३९५ ॥
नामाने रंगावे रंगात । रंग येतो पुढ्यात ।
तोच रमवे नामात । रंगले रंग नामात ॥ ३९६ ॥
नामात होता रंग । रंगच रंगवे रंग ।
नामाचा ऐसा रंग । तोषे अवधूत रंग ॥ ३९७ ॥
रंगून जावे रंगात । तेणे अवधूत रंगात ।
तोषे नामाच्या रंगात । रंगुन जातो नामात ॥ ३९८ ॥
रंग रंग नामाचा । ऐसा महिमा रंगाचा ।
रंगाने नाम रंगाचा । योग भाग्याचा ॥ ३९९ ॥
नामात सदा रमावे । तेणे नाममय व्हावे ।
प्रारब्ध सोपवावे । निश्चिंत असावे ॥ ४०० ॥
नाम जितुके आळवाल । तितुके त्यात रमाल ।
नामाने आचराल । सत्पथ वाटचाल ॥ ४०१ ॥
नाममय होता । भगवंतमय होता ।
तो जवळ येता । भवभय न चित्ता ॥ ४०२ ॥
नामाला करता जवळ । तेणे निश्चय जवळ ।
वाढे निश्चयाचे बळ । तेणे निश्चित फळ ॥ ४०३ ॥
नामाला जवळ करावे । नामातच रमावे ।
नामाचेच ऐकावे । नामानेच तरावे ॥ ४०४ ॥
नामाचा लावता वशीला । भगवंत होतो आपला ।
तेणे ताप प्रपंचातला । न जाळे चित्ताला ॥ ४०५ ॥
नामाशी जडता नाते । चिंता काळजी हरते ।
भवभय न उरते । सर्व आनंदमय दिसते ॥ ४०६ ॥
नाते जडता नामाशी । चिंता काळजी न उराशी ।
नाते जडता आनंदाशी । नाते जडते भगवंताशी ॥ ४०७ ॥
नामाशी नाते जोडा । तेणे भगवंत जोडा ।
तेणे भवभय सोडा । तेणे आनंद जोडा ॥ ४०८ ॥
नामाशी नाते जोडता । तेणे सुटतो गुंता ।
नामात चित्त गुंतता । हरे भवताप चिंता ॥ ४०९ ॥
नामासारखा सोबती । नाही कुणी ह्या जगती ।
कुठचीही येता परिस्थिती । समतोल राहाता चित्ती ॥ ४१० ॥
नामाने जे अनुभवता । पुढिल प्रसंगी त्राता ।
नाम घेता येता जाता । आपत्काळी तरता ॥ ४११ ॥
नका करू मनाचे लाड । नका जपु जीवापाड ।
नामाचे करावे लाड । नामास जपावे जीवापाड ॥ ४१२ ॥
नको भटकु मना । नको गुरफटु मना ।
नको दुबळेपणा । नको जगु नामाविणा ॥ ४१३ ॥
नामाशी करावे सख्य । तेणे ने पदरी दुःख ।
रहाल सदा हसतमुख । हेच जीवनाचे सुख ॥ ४१४ ॥
सुखदुःख जे मानता । तेणेच दुःखी होता ।
नामाशी नाते जोडता । सुख दुःखे विसरता ॥ ४१५ ॥
नामाशी नाते जोडावे । सुखसुःख विसरावे ।
नामातच धुंद व्हावे । सर्वांत भगवंत पहावे ॥ ४१६ ॥
कनक आणि कांता । हीच जाळते चित्ता ।
त्याच्यात अती रमता । उध्वस्त होता ॥ ४१७ ॥
कनक आणि कांता । नामाशी जोडता ।
नामावर सोपवता । जीवनी तरता ॥ ४१८ ॥
कनक कांतेचा मोह । कधी न हितावह ।
तेणे न तरला भव । न तरणार भव ॥ ४१९ ॥
कनक कांतेचा मोह । तेणे सदा भय ।
नामात रमवता जीव । तेणे निर्भय ॥ ४२० ॥
कनक कांता ऐशी । संबंध मोहमायेशी ।
सदा त्यांचे पाशी । चिंता काळजी उराशी ॥ ४२१ ॥
नका चिंतु विषय । नाम चिंतावे अक्षय ।
विषये चिंता काळजी भय । नामाने बने निर्भय ॥ ४२२ ॥
नको विषय चिंतन । विषयाने दाणादाण ।
नामात व्हावे रममाण । नामाने आनंद समाधान ॥ ४२३ ॥
नको विषयाचे दास । तेणे आनंदाचा र्हास ।
नामाचे होता दास । सदा आनंद उल्हास ॥ ४२४ ॥
विषयी गुंतता मती । तेणे होते अधोगती ।
नाम असता मुखावरती । तेणे साधता प्रगती ॥ ४२५ ॥
विषय वाईट अत्यंत । सर्वच बुडाले विषयात ।
परी राहात नामात । तरता भवसागरात ॥ ४२६ ॥
विषयात धुंद होता । चित्ती अस्वस्थता ।
नामात धुंद होता । चित्ती प्रसन्नता ॥ ४२७ ॥
विषय सेवावा मोजका । तोल सावरण्या इतुका ।
वेळी अवेळी नाम मुखा । उपयुक्त न नामाइतुका ॥ ४२८ ॥
कनक कांता केवढे ? । अत्यावश्यकता एवढे ।
त्यातच होता वेडे । चिंता काळजीचे वेढे ॥ ४२९ ॥
कांता नि कनक । मोह मायेचे जनक ।
असता अनावश्यक । जीवन निरर्थक ॥ ४३० ॥
नामाचे सुत कातावे । त्याचेच धागे विणावे ।
त्याचेच वस्त्र ल्यावे । आत्म्यास तोषावावे ॥ ४३१ ॥
विविध वस्त्रे जगती । सदा चित्त आकर्षिती ।
परी नामवस्त्रांवरती । शांती समाधान चित्ती ॥ ४३२ ॥
नको वैभव उसने । मनोराज्य करणे ।
नाम परिधान करणे । हेच हितावह असणे ॥ ४३३ ॥
नामाचे वस्त्र ऐसे । स्वकमाईचे दिसे ।
स्वानुभवे जगतसे । खात्रीचा मार्ग असे ॥ ४३४ ॥
नामाच्या वस्त्रात । आनंदाच्या धाग्यात ।
तेच परिधानात । अर्पण सुख भावात ॥ ४३५ ॥
नामाच्या वस्त्रांवर । संतुष्ट परमेश्वर ।
तेच त्याला अर्पिल्यावर । संतोषे परमेश्वर ॥ ४३६ ॥
नामाचे धागे सुखाचे । खर्याखुर्या आत्मसुखाचे ।
लवलेश न दुःखाचे । हेच बोल अनुभवाचे ॥ ४३७ ॥
एकेक धागा नामाचा । ‘तो’ स्वये गुंफण्याचा ।
‘तो’च होता प्राप्तीचा । तोच क्षण भाग्याचा ॥ ४३८ ॥
आपल्या भाग्यात अनेक । नाही नामासारखे एक ।
होता नाममयच । काही न मागणे शिल्लक ॥ ४३९ ॥
नामाचे वस्त्र जाडे साधे । नात्याचे धागे बांधे ।
तेच भगवंता आवडे । जगण्याचा हेतु साधे ॥ ४४० ॥
नामाच्या विविध छटा । आनंद धाग्याचा सांठा ।
ऐसे परिधान करता । आनंदी आनंदे जगता ॥ ४४१ ॥
नामवस्त्र परिधानात । बेअब्रु न होण्यात ।
सार्या जगा दावतात । सारे अनुसरतात ॥ ४४२ ॥
आम्ही झालो नामाचे । आता न कारण भितीचे ।
आता नामाचे पहायचे । आता नामाने जगायचे ॥ ४४३ ॥
‘मी’ ने जे जे केले । ते काही व्यर्थ ठरले ।
नामाने जे सांगितले । अनुसरण्या हीत झाले ॥ ४४४ ॥
आधी करावे नामस्मरण । नको नुसते चिंतन ।
तैसे होता आचरण । फलदायी नामस्मरण ॥ ४४५ ॥
नाम जे जे सांगेल । तेच हितावह ठरेल ।
हे जेव्हा मना पटेल । तेव्हा मनःशांती लाभेल ॥ ४४६ ॥
नाम आनंदासाठी । न नुसत्या चिंतनासाठी ।
नाम आचरणासाठी । मनःशांती साठी ॥ ४४७ ॥
आनंद आहे नामात । दडुन बसला त्यात ।
प्रेरणेने आचरणात । मिळवाल निश्चित ॥ ४४८ ॥
नामातला एकेक पळ । देण्या आनंद सकळ ।
परी विरुद्ध आचराल । न काही मिळवाल ॥ ४४९ ॥
नामामुळे सर्व कळते । परी वागण्या दुःख होते ।
नामावर खात्री नसते । तेथे ऐसेच घडते ॥ ४५० ॥
नामाने न होणार दुःख । तेणे आनंदमुख ।
‘मी’ ची होता जवळीक । सर्वात दिसते दुःख ॥ ४५१ ॥
नामावर भरंवसा ठेवा । हाच प्रयोग करावा ।
तैसा मार्ग आक्रमावा । नित्यनेम करावा ॥ ४५२ ॥
नुसत्या चिंतनाने निष्फळ । जैसी बडबड वायफळ ।
नामाने जे आचराल । आनंदच मिळवाल ॥ ४५३ ॥
आनंद म्हणजे परमेश्वर । व्याप्त केले चराचर ।
भरंवसा ठेवा नामावर । आनंद होईल साकार ॥ ४५४ ॥
नामास करता जवळ । काढाल मनाचा मळ ।
तो निघता सकळ । आनंदच दिसेल ॥ ४५५ ॥
मनावरची एकेक पुटे । नामच दूर करते ।
नाम जवळ करण्याते । मन स्वच्छ होते ॥ ४५६ ॥
नाम ऐसे साधन । उपयुक्त क्षणोक्षण ।
मळपुटे दूर करुन । ठेवले स्वच्छ मन ॥ ४५७ ॥
नाम ऐसे द्रावण । न सांडे एकही कण ।
कुठेही उपयुक्त साधन । स्वच्छ करेल मन ॥ ४५८ ॥
जे जे गढुळ मनात । ते ते कळते नामात ।
गढुळ दूर करण्यात । नामच ठरे श्रेष्ठ ॥ ४५९ ॥
शुद्ध आणि गढुळ । नामात कळे सकळ ।
पळे दूर गढुळ । नाम येता जवळ ॥ ४६० ॥
नामाचा आधार मोठा । नामच प्रसंगी त्राता ।
नाम श्रद्धेने भजता । चिंता क्लेश विसरता ॥ ४६१ ॥
नाम भजावे नाम । भगवंताचे नाम ।
निश्चय करा ठाम । भगवंताचा मुक्काम ॥ ४६२ ॥
श्रद्धेने नाम भजावे । श्रद्धेने पाऊल टाकावे ।
श्रद्धेत हीत मानावे । अश्रद्धेने न जगावे ॥ ४६३ ॥
नामावर श्रद्धा बाळगा । नको चिंता काळजी उगा ।
नामाने खात्रीने जगा । तेणे भय न काळजा ॥ ४६४ ॥
नामात नित्य रमावे । नित्य अनित्य ओळखावे ।
नित्यात मन गुंतवावे । तेच हीत समजावे ॥ ४६५ ॥
नारायण आम्हां देतो । नामात बोध होतो ।
जो नारायण स्मरतो । आनंद वृत्तीने जगतो ॥ ४६६ ॥
नामावर श्रद्धा ठेवा । नामाचा नेम करावा ।
नामानेच आळवावा । हीच भगवंत सेवा ॥ ४६७ ॥
नामास जवळ करता । ‘त्यास’ जवळ करता ।
नामास दूर लोटता । ‘त्यास’ दूर लोटता ॥ ४६८ ॥
नामास जवळ करावे । नित्य नाम स्मरावे ।
नामात हित मानावे । गुरू बोल ऐकावे ॥ ४६९ ॥
नामच खरा सखा । नोच खरा पाठीराखा ।
तोच तारे सुखदुःखा । नाही कुणी नामासारखा ॥ ४७० ॥
नामा तुझी ऐशी महती । जे जे नामात रमती ।
सुखदुःखे विसरती । सुखदुःखा न महत्व देती ॥ ४७१ ॥
नाम घ्या हो नाम । भगवंताचे नाम ।
तेणे आनंद मुक्काम । तेणे आनंदधाम ॥ ४७२ ॥
मुखे नाम किती घ्यावे ? । ज्याने त्याने ठरवावे ।
नाम शाश्वतास दावे । अशाश्वतास घालवे ॥ ४७३ ॥
नामे लाभते शाश्वत । गुंतते मन शाश्वतात ।
लोप पावते अशाश्वत । हीच किमया नामात ॥ ४७४ ॥
नामात जे जे मिळते । ते शाश्वतावर असते ।
शाश्वताची गोडी लागते । शाश्वतात मन रमते ॥ ४७५ ॥
नामात तुम्ही रहाता । शाश्वताशी नाते जोडता ।
शाश्वतास जवळ करता । भगवंतास जवळ करता ॥ ४७६ ॥
जीव रमवा नामात । नामच उपयुक्त सर्वात ।
नाम असता मुखात । जीव राहातो आनंदात ॥ ४७७ ॥
सदा नाम श्रद्धेने घ्या । श्रद्धेने भरा खळगा ।
तेणे न काळजी काळजा । चिंता भय होते वजा ॥ ४७८ ॥
नामास कळते पुढचे । नामच सांगे हिताचे ।
जेथे स्मरण नामाचे । तेथे भय न काळजीचे ॥ ४७९ ॥
गुरू आज्ञेत हित मानावे । गोरे काळे विसरावे ।
नामाच्या तालात जगावे । नामावरच सोपवावे ॥ ४८० ॥
नामाचा होता धूर । विषय पळती दूर ।
चित्तातली हुरहुर । होते सर्वथा दूर ॥ ४८१ ॥
नामाचा धूर करावा । तेणे विषय घालवावा ।
विषय न पोसावा । तोल सदा सावरावा ॥ ४८२ ॥
नाम सदा अक्षय । क्षणभंगुर विषय ।
नाम सदा आनंदमय । विषय सदा दुःखमय ॥ ४८३ ॥
नाम खरा खुरा शाश्वत । विषय सदा अशाश्वत ।
नामात होते स्थिर चित्त । विषयात अस्थिर चित्त ॥ ४८४ ॥
नाम स्थिर नि शांत । विषय अस्थिर अशांत ।
नामात चित्त शांत । विषयी चित्त अशांत ॥ ४८५ ॥
विषयाने तोल जातो । नामाने सावरला जातो ।
विषयात घसरतो । नामात उद्धरतो ॥ ४८६ ॥
विषय हवाहवासा वाटतो । तेणेच घात होतो ।
नामात विषय दूर जातो । नामाचा आधार वाटतो ॥ ४८७ ॥
अती विषय घातक । तेणे महापातक ।
नामस्मरण तारक । नाम पाप विनाशक ॥ ४८८ ॥
विषय दुःखकारक । सदा पीडादायक ।
नाम सुखकारक । सदा मंगलदायक ॥ ४८९ ॥
विषय विघ्नकारक । नाम विघ्नहारक ।
विषय हानीकारक । नाम लाभदायक ॥ ४९० ॥
नको विषय फाजील । चित्तास सदा जाळतील ।
नामात तरशील । अनुभवच बोलशील ॥ ४९१ ॥
कुणी न तरला भव । हा विषय अनुभव ।
नामात तरती भव । हा खात्रीचा अनुभव ॥ ४९२ ॥
नामाचा लळा लागता । हा जीव रमु लागला ।
स्मरता तुझ्या लीला । आनंद वाटे मला ॥ ४९३ ॥
नामा ! तूच दावतो । आनंद कोठे वसतो ! ।
जो जो स्मरण करतो । तो आनंदात राहातो ॥ ४९४ ॥
जेथे नामाचा वास । तेथे आनंद सहवास ।
जेथे आनंद वास । तेथे भगवंत वास ॥ ४९५ ॥
नामा तुझ्यावर आता । वाटे विसंबावे आता ।
तुझ्यावर ठेवता निष्ठा । मला न काळजी चिंता ॥ ४९६ ॥
नामा तुझ्या सारखा । तुच सदा पाठीराखा ।
खर्या अर्थाने तू सखा । म्हणे तरशील लेका ॥ ४९७ ॥
नाम माझा सखा खरा । नामच माझा आसरा ।
नाम असता माझ्या घरा । सदानंद माझ्या घरा ॥ ४९८ ॥
नाम घ्या हो नाम । आनंद शांतीचे नाम ।
भजता हरीचे नाम । आनंद शांती मुक्काम ॥ ४९९ ॥
नामात जीव रमवा । चिंता क्लेशास घालवा ।
अंतरात्म्यास तोषवा । परमात्म्यास तोषवा ॥ ५०० ॥
नाम येता ओठावरी । हरी दिसे ओसरीवरी ।
आनंद येतो घरी । हरीच्या बरोबरी ॥ ५०१ ॥
नामात रंगुन जावे । हरी स्मरणात रंगावे ।
हरीलाच सोपवावे । सारे तुझेच म्हणावे ॥ ५०२ ॥
नाम आळवा नाम । भगवंता प्रिय नाम ।
जेथे जेथे त्याचे नाम । तेथे त्याचा मुक्काम ॥ ५०३ ॥
नाम ऐसे आळवावे । भगवंताने ऐकावे ।
भगवंताने तल्लीन व्हावे । ऐसे नाम भजावे ॥ ५०४ ॥
भगवंत तोषे नामात । नाही नुसत्या वैभवात ।
नामावाचुन वैभवात । तेणे आत्म्यावाचुन देहात ॥ ५०५ ॥
नामास आत्मा समजा । त्याचीच करा पूजा ।
येता जाता नाम भजा । अंतरात्म्याकडे बघा ॥ ५०६ ॥
येता जाता नाम भजता । नाममयच होता ।
चिंता काळजी मुक्त होता । नाम मुखी येता ॥ ५०७ ॥
जे न मिळे वैभवात । त्याहुन अधिक नामात ।
नाम ज्याच्या मुखात । लोणीसाखर मुखात ॥ ५०८ ॥
नाम ज्याच्या मुखात । मृदुता संभाषणात ।
क्लीष्टता पळे पळात । मधुरता येई शब्दात ॥ ५०९ ॥
नामाचे अलंकार घाला । भूषवावे देहाला ।
भगवंत भुले नामाला । हेच येते अनुभवाला ॥ ५१० ॥
नामा तुला काय कळते ? । म्हणणे मूर्खाचे होते ।
जे आपणांस न कळते । ते नामास कळते ॥ ५११ ॥
नाम म्हणजे काय ? । नाम म्हणजे तरणोपाय ।
नामास म्हणावे माय । हांक मारता होते धाव ॥ ५१२ ॥
नाम म्हणजे माऊली । सदा कृपेची सावली ।
नामाच्या छत्राखाली । भवताप न जाळी ॥ ५१३ ॥
नामास माऊली म्हणावे । नामास आधार मानावे ।
नामाचेच ऐकावे । जीवन सार्थक करावे ॥ ५१४ ॥
नाम ओळखे माया । म्हणे नको सतावु बया ।
तान्हुल्यांच्या जीवा । जाळु नकोस बया ॥ ५१५ ॥
नाम माया ओळखते । मायेस परतवते ।
माया पुढे येण्याते । नामास घाबरते ॥ ५१६ ॥
नाम म्हणजे माता । भवसागर त्राता ।
येता जाता भजता । भयमुक्त होता ॥ ५१७ ॥
नामाची आज्ञा पाळा । तेणे तोषवा गोपाळा ।
नाम जपते तान्हुल्या । दावते वात्सल्या ॥ ५१८ ॥
नामास माता म्हणता । खर्या अर्थी जगता ।
नामाची आज्ञा पाळता । भगवंत तोषता ॥ ५१९ ॥
नामाचे लेकरू आपण । नामाचे वाक्य प्रमाण ।
नामाविण जीवन । म्हणजे पोरकेपण ॥ ५२० ॥
नामाने पोसले आपणा । विसरु नका एकेक क्षणा ।
जगु नका स्मरणाविणा । नको नको कृतघ्नपणा ॥ ५२१ ॥
नाम जगत् जननी । आनंदाची जननी ।
नाही थोर झाले कुणी । नाम जननी वाचुनी ॥ ५२२ ॥
नामाची सेवा करा । तोच तरणोपाय खरा ।
नामाचा घेता आसरा । रोज दिवाळी दसरा ॥ ५२३ ॥
सेवा करा नामाची । तेणे सेवा भगवंताची ।
भगवंता तोषण्याची । किमया आहे नामाची ॥ ५२४ ॥
जो नामात रंगतो । तो वैकुंठात जातो ।
नरदेहाचे सोने करतो । मरणोत्तरही जगतो ॥ ५२५ ॥
नामानेच खरे जगता । कळते नाम भजता ।
नाम घेता येता जाता । मोह माया जिंकता ॥ ५२६ ॥
जो नामात असतो । तो तोल सावरतो ।
जो नाममय होतो । तोच पुढे जातो ॥ ५२७ ॥
नामात ऐसे रंगावे । भगवंताने थक्क व्हावे ।
तेणे स्वयेच पुढे यावे । कृपाशिष द्यावे ॥ ५२८ ॥
नामात जीव रमवता । कृपाशिष मिळवता ।
तेणे जीवा उद्धरता । पैलतीर गाठता ॥ ५२९ ॥
येता जाता घेता नाम । तेणे ज्ञानाचा मुक्काम ।
अज्ञानास रामराम । जगण्यात खरा राम ॥ ५३० ॥
नामास हरघडी भजता । हरघडीस हरी पहाता ।
त्याच्यात धुंद होता । सभोवताल विसरता ॥ ५३१ ॥
रमा रमा हरीनामात । हरघडी रमा त्यात ।
हरीच्या नामोच्चारात । हरीच येतो पुढ्यात ॥ ५३२ ॥
हरीस सदा भजावे । हरी हरी म्हणावे ।
हरीने सत्वर यावे । चिंतेस मुक्त करावे ॥ ५३३ ॥
नामाचे आपण होता । हरीचे आपण होता ।
आपण हरीमय होता । हरी हरीच म्हणता ॥ ५३४ ॥
नामात धुंद व्हावे सदा । तेणे भेटतो ‘सदा’ ।
नामाशी असता सदा । तेणे पाठीशी सदा ॥ ५३५ ॥
नामाशी होता एकरूप । पहाता एकरूप ।
चित्ती ठासता एकरूप । पहाता एकरूप ॥ ५३६ ॥
एकरूप व्हावे नामाशी । तेणे विविध रूपांशी ।
एकरूप होता त्याशी । आनंदाच्या राशी ॥ ५३७ ॥
नामाशी एकरूप व्हावे । एकात धुंद व्हावे ।
अनेकात एक पहावे । एकात अनेक पहावे ॥ ५३८ ॥
नामाशी एकरूप होता । नामाचे बोल बोलता ।
त्यातच रम्गुन जाता । विविध रंग पहाता ॥ ५३९ ॥
नामात रंगुन जाण्यात । त्याला रंगुन टाकतात ।
दोघे जेव्हा रंगतात । फळे फुले बहरतात ॥ ५४० ॥
नामात रंगुन जावे । नामानेच रंगवावे ।
त्याने प्रफुल्लित व्हावे । आपणासही रंगवावे ॥ ५४१ ॥
नामाच्या एकरूपतेत । रहाता प्रसन्नतेत ।
कधी न चिंता व्यथेत । काळजी उद्विग्नतेत ॥ ५४२ ॥
नामाचे बोल बोलता । अपशब्द टाळता ।
मधुर बोल बोलता । मधुर फळे चाखता ॥ ५४३ ॥
नामाची गोडी ऐशी । सहाता अमृताशी ।
गोडी चाखता ऐशी । रहाता सदा नामाशी ॥ ५४४ ॥
नामाचे बोल मधुर । मुळातच नाम मधुर ।
नामाचे बी मधुर । तेणे फळेही मधुर ॥ ५४५ ॥
नामास जवळ करता । जीवनी मधुरता ।
जरी येता कटुता । मधुरच म्हणता ॥ ५४६ ॥
नामाची किमया ऐशी । ती वर्णावि कैसी ? ।
आनंदाच्या इतुक्या राशी । काय मोजणार त्यासी ? ॥ ५४७ ॥
नामात ऐसे रंगावे । मोजमाप नसावे ।
अहर्निश भजावे । अहर्निश रंगावे ॥ ५४८ ॥
नामात धुंद होता । भगवंत वृंद पहाता ।
त्यातच धुंद होता । आनंद वृंद पहाता ॥ ५४९ ॥
येता जाता नाम म्हणता । आनंद आनंद म्हणता ।
त्याशी एकरूप होता । आनंदमय होता ॥ ५५० ॥
नामात वसला आनंद । तेणे नामात आनंद ।
नामात मिळता आनंद । भेटतो सदानंद ॥ ५५१ ॥
ऐसे नाम आळवावे । नयनाश्रु ओघळावे ।
आनंदाश्रु समजावे । आनंद अनुभवावे ॥ ५५२ ॥
नाम नाम भजता । निर्गुणास भजता ।
ऐसे नाम भजता । ‘त्यास’ सगुण करता ॥ ५५३ ॥
ऐसे नाम भजावे । निर्गुण सगुण व्हावे ।
ऐसे निर्गुण वर्णावे । सगुणच वाटावे ॥ ५५४ ॥
नाम घेता निर्गुणाचे । गुण गाता सगुणाचे ।
नाम घेता सगुणाचे । तेणे होता निर्गुणाचे ॥ ५५५ ॥
नाम येता मुखाते । निर्गुण सगुण कळते ।
दोन्ही अनुभवण्याते । खरे खुरे कळते ॥ ५५६ ॥
निर्गुणाचे नाम घेता । त्यास सगुण करता ।
सगुणाचे नाम घेता । निर्गुणमय होता ॥ ५५७ ॥
नाम घेता सगुणाचे । अनुभव निर्गुणाचे ।
गुण गाता त्याचे । अनुभव आनंदाचे ॥ ५५८ ॥
प्रभु नाम भजता । काळ काम विसरता ।
नाममय होता । भूक तहान विसरता ॥ ५५९ ॥
नाम येता मुखाने । आनंदाचे येते भरते ।
तेणे तहान शमते । भूक पार विसरते ॥ ५६० ॥
नामात ऐसे रंगावे । प्रभु नामच दिसावे ।
रूपही अदृष्य व्हावे । निर्गुणमय व्हावे ॥ ५६१ ॥
नामाशी नाते जोडता । निर्गुणास जोडता ।
त्यास सर्वांत पहाता । निर्गुणमय होता ॥ ५६२ ॥
होता नाममय । होता निर्गुणमय ।
सगुणाचे काय ? । त्याचे त्याला ठाव ॥ ५६३ ॥
नाममय होता आपण । सगुण होतो निर्गुण ।
निर्गुणाचे गाता गुण । पुन्हा होतो सगुण ॥ ५६४ ॥
नामात साधता । आनंद स्वरूपता ।
जितुकी एकरूपता । तितुका अनुभवता ॥ ५६५ ॥
नामात एकरूप व्हा । तेणे आनंद मिळवा ।
त्यातच तल्लीन व्हा । सत्स्वरूप पहा ॥ ५६६ ॥
सामात काय मिळते ! । नामात सर्व मिळते ।
आनंद प्राप्त होण्याते । काय न मिळते ? ॥ ५६७ ॥
नामात एकरूपता साधा । तेणे आनंद साधा ।
तेणे परमार्थ साधा । तेणे सर्व साधा ॥ ५६८ ॥
नामात होता एकरूप । पहाता चित्स्वरूप ।
पहाता अरूप स्वरूप । पहाता भगवंत स्वरूप ॥ ५६९ ॥
एकरूप होता नामात । तेणे रहाता आनंदात ।
भवदुःख न जाणवतात । आपण रमता नामात ॥ ५७० ॥
नामात एकरूप होता । फक्त नामच पहाता ।
त्यात स्वरूप दिसता । मिळे आनंद चित्ता ॥ ५७१ ॥
नामात एकरूप व्हावे । नाममय व्हावे ।
आनंदस्वरूप पहावे । आनंदमय व्हावे ॥ ५७२ ॥
नामात साधा एकरूपता । आनंद प्राप्त करता ।
त्यात एकरूप होता । नाममयच होता ॥ ५७३ ॥
नामात एकरूपता साधता । सभोवताल विसरता ।
भवदुःख विसरता । आनंद प्राप्त करता ॥ ५७४ ॥
नामाशी एकरूप व्हावे । तेणे एकरूप पहावे ।
आनंद अनुभवावे । स्वानुभव घ्यावे ॥ ५७५ ॥
एकरूप होता नामाशी । आनंदाच्या राशी ।
येतात आपणापाशी । आनंद देण्यासी ॥ ५७६ ॥
एकरूप व्हावे नामात । तेणे सदा आनंदात ।
सुखसुःखे विरतात । रहाता नामात ॥ ५७७ ॥
एकरूप व्हा नामात । एकरूप व्हा एकरूपात ।
एकरूप व्हा आनंदात । एकरूपता सर्वात ॥ ५७८ ॥
नको नुसते नामात । एकरूपता हवी त्यात ।
एकरूपे वीण नामात । काहुर माजतात ॥ ५७९ ॥
नाम आणि एकरूपता । ह्यांचे नाते जडता ।
कमी होते जडता । एकरूप जडता ॥ ५८० ॥
नामात जडते एकरूप । जडता एकरूप ।
पहाता चित्स्वरूप । पहाता आनंदरूप ॥ ५८१ ॥
नामात एकरूपता जडता । कळु लागते जडता ।
जडता पार विसरता । एकरूपाशी जडता ॥ ५८२ ॥
नामात एकरूप जडते । जडता जड होते ।
जडता तळाशी बसते । कधी न वर येते ॥ ५८३ ॥
नामात एकरूप होता । जडता विसरता ।
जडता घालवता । एकरूप जडता ॥ ५८४ ॥
नामाच्या एकरूपतेत । रहाता ‘एकरूपतेत’ ।
जडण्या एकरूपतेत । न रहात जडतेत ॥ ५८५ ॥
नामाची सोबत ऐशी । सदा असते पाठीशी ।
नाम असता मुखाशी । चिंता काळजी न उराशी ॥ ५८६ ॥
नामाची असता सोबत । ऐकता आनंद नौबत ।
आनंद होता ओतप्रोत । ज्ञान प्रकाशाचा झोत ॥ ५८७ ॥
नामाची सोबत करावी । ती आधार मानावी ।
चिंता काळजीस घालवी । तेणे आनंद पालवी ॥ ५८८ ॥
सोबत असावी नामाची । खरी जरूर त्याची ।
निराशा, सुखदुःखाची । मात्रा न चालायची ॥ ५८९ ॥
हरी नाम खरे सोबती । तेणे हरी सोबती ।
चिंता भय न चित्ती । हरी सांठता चित्ती ॥ ५९० ॥
नामाची सोबत खरीखुरी । चिंता काळजी न उरी ।
चिंता पळते दूरवरी । येता नाम मुखावरी ॥ ५९१ ॥
नामाची सोबत असावी । त्याची कांस धरावी ।
ऐशी हांक मारावी । माऊली जवळ यावी ॥ ५९२ ॥
नामाची सोबत असता । हरीस पहाता तत्वता ।
तेणे आनंदमय सर्वथा । आनंद आनंद म्हणता ॥ ५९३ ॥
नामाची सोबत करता । आनंदमय जगता ।
चिंता काळजी न वृथा । ईश्वराचा हेतू म्हणता ॥ ५९४ ॥
नामाची असता जोड । भगवंताची जोड ।
जितुकी नामात ओढ । तितुके नाम गोड ॥ ५९५ ॥
नामाने नाम जोडता । भगवंतच जोडता ।
भवदुःख तोडता । आनंद जोडता ॥ ५९६ ॥
जोड असता नामाची । जोड भगवंताची ।
जोड असता दोघांची । जोड आनंदाची ॥ ५९७ ॥
नामाने नाम जोडता । नामपथ करता ।
नामपथावर चालता । मुक्कामी पोहोचता ॥ ५९८ ॥
नाम घ्यावे ओढीने । भगवंताच्या गोडीने ।
नाम घेता गोडीने । भगवंत येतो ओढीने ॥ ५९९ ॥
नामात असावी ओढ । तेणेच नाम गोड ।
जितुकी नामात ओढ । तितुकी भगवंताची जोड ॥ ६०० ॥
नाम घ्यावे सवडीने । भगवंताच्या ओढीने ।
नामाच्याच गोडीने । भगवंताचे होते येणे ॥ ६०१ ॥
भुले भगवंत नामाला । भुले नामाच्या गोडीला ।
अधिकाधिक गोडीला । अधिक अधिक जोडीला ॥ ६०२ ॥
नाम घ्यावे कर्तव्याने । कर्तव्याच्या जाणीवेने ।
मिळते सर्व जाणीवेने । जाते सर्व उणीवेने ॥ ६०३ ॥
नाम घ्यावे आळवुन । कर्तव्य जाणीव ठेवुन ।
नाम घेता आपणहुन । भगवंत येतो आपनहुन ॥ ६०४ ॥
नाम आळवुन घेता । भगवंत येता जाता ।
तोच ठरतो त्राता । संकट निवारता ॥ ६०५ ॥
कर्तव्याने नाम घ्यावे । कर्तव्य चोख बजवावे ।
नामाने मन पोसावे । अंतरात्म्या तोषवावे ॥ ६०६ ॥
नामासाठी नाम घ्यावे । निश्चय ठाम असावे ।
देणार्याने द्यावे । सर्व त्याचे समजावे ॥ ६०७ ॥
काय आहे देहात ? । काय नाही नामात ? ।
ह्याच सदा जाणीवेत । नाम यावे मुखात ॥ ६०८ ॥
जितुके नामात प्रेम । तितुका नामाचा नेम ।
तितुके भगवंताचे प्रेम । जितुके नामात प्रेम ॥ ६०९ ॥
प्रेम करावे नामावर । तेणे प्रेम भगवंतावर ।
जितुका नेम नामावर । तितुका भगवंतावर ॥ ६१० ॥
नेम घरावा नामाचा । नेम धरावा भगवंताचा ।
तेणे शिकार होण्याचा । योग भगवंताचा ॥ ६११ ॥
जितुका नामाचा रोख । तितुका भगवंत चोख ।
नामाचा नेम अचुक । भगवंत बिनचुक ॥ ६१२ ॥
साधा साधा एकरूपता । नामात तुम्ही असता ।
एकरूपता असता । आनंद स्वरूप पहाता ॥ ६१३ ॥
नामात एकरूपता । तेणे काहुर न चित्ता ।
सदा वसे प्रसन्नता । विरे उद्विग्नता ॥ ६१४ ॥
नामात एकरूप होता । आनंदाचेच होता ।
प्रारब्ध सहज भोगता । त्यास महत्व न देता ॥ ६१५ ॥
नामात एकरूप होता । चिंता क्लेश विसरता ।
नामात आनंद मिळता । आनंद वृत्तीने जगता ॥ ६१६ ॥
नामाने मनास पोसता । देहास पोसता पोसता ।
आत्मोन्नती करता । अधोगती टाळता ॥ ६१७ ॥
नामाने होते आत्मोन्नती । तेणे आत्म्यास आनंद अती ।
आनंद साठता चित्ती । भगवंताची प्रिती ॥ ६१८ ॥
सदा नामाभोवती । तेणे शाश्वत सभोवती ।
शाश्वतावर होते प्रिती । अशाश्वताची न भिती ॥ ६१९ ॥
नामात साधता शाश्वत । तेणे टाळता अशाश्वत ।
शाश्वतच खरे सत्य । अशाश्वत असत्य ॥ ६२० ॥
नामात साधता सत्य । दूर लोटता असत्य ।
भगवंता प्रिय सत्य । तेणे भेटतो नित्य ॥ ६२१ ॥
येता जाता घेता नाम । सत्याचाच मुक्काम ।
असत्यास लगाम । असत्यास रामराम ॥ ६२२ ॥
नामात असता नित्य । दिसु लागते सत्य ।
दूर पळते असत्य । असता नाम सातत्य ॥ ६२३ ॥
नामाच्या सातत्यात । सत्यच येते पुढ्यात ।
सदा रमता सत्यात । भगवंत येतो पुढ्यात ॥ ६२४ ॥
नामात जडते सत्य । नामच मुळात सत्य ।
नामात असता नित्य । दूर लोटता अनित्य ॥ ६२५ ॥
नामात आपण असावे । तेणे सत्यास पहावे ।
सत्यच जवळ करावे । असत्यास घालवावे ॥ ६२६ ॥
नाम मुळात बोलके । तेणे करते बोलके ।
अशाश्वताचे धोके । टाळण्या होते बोलके ॥ ६२७ ॥
नाम मुळातच बोलके । कैसे होणार मुके ? ।
नामास म्हणता मुके । तो आनंदास मुके ॥ ६२८ ॥
नामाने बोलके व्हावे । भगवंताशी बोलावे ।
ऐसे आपण बोलावे । भगवंताने बोलावे ॥ ६२९ ॥
नामातला शब्द एकेक । लक्ष वेधतो एकेक ।
नामात मिळते एक एक । नामातच मिळते अनेक ॥ ६३० ॥
एकासाठी जे नाम । अनेकांसाठी ते नाम ।
एकाचे घेता नाम । अनेक साधता नाम ॥ ६३१ ॥
नामाचे बोलता बोल । नेमके बोलता बोल ।
वायफळाचा न घोळ । सदा सावरता तोल ॥ ६३२ ॥
नामात असता लक्ष । तेणे साधता लक्ष्य ।
त्यासी होता सख्य । असख्याशी सख्य ॥ ६३३ ॥
नामाशी होता सख्य । भगवंताशी सख्य ।
तेणे सत्याशी सख्य । तेणे आनंदाशी सख्य ॥ ६३४ ॥
नामाशी सख्य साधता । सर्वांशी सख्य साधता ।
असख्य सदा टाळता । सख्याचे महत्व कळता ॥ ६३५ ॥
नामाचे बोल बोलता । सख्याचे बोल बोलता ।
सख्याशी सख्य होता । भगवंताशी सख्य करता ॥ ६३६ ॥
नामात सख्य जडते । सख्याशी नाते जडते ।
सख्याचे होण्याते । भगवंताचे होण्याते ॥ ६३७ ॥
नामात सख्याचा भाव । असख्याचा अभाव ।
असता नामाचा अभाव । असख्याचा भाव ॥ ६३८ ॥
नामाशी सख्य करता । सख्य भावे जगता ।
असख्य पार विसरता । सख्यात रममाण होता ॥ ६३९ ॥
नामाशी सख्य करावे । तेणे शाश्वताचे व्हावे ।
शाश्वतात रमावे । तेणे भगवंताचे व्हावे ॥ ६४० ॥
नामाशी होता सख्य । सख्य असख्य दुर्लक्ष ।
नामाकडे असता लक्ष । भगवंताकडे लक्ष ॥ ६४१ ॥
नामात असता लक्ष । भगवंताचे वेधता लक्ष ।
तेणे आनंदाशी सख्य । काळाचे न भक्ष्य ॥ ६४२ ॥
नामात आंसु गाळता । दःखाश्रु टाळता ।
नामात आंसु टाळता । दःखाश्रु गाळता ॥ ६४३ ॥
नामात गाळता आंसवे । व्यवहारी हांसवे ।
नामात टाळता आंसवे । व्यवहारी आंसवे ॥ ६४४ ॥
नामात अश्रु गाळता । आनंदात भिजता ।
नामात अश्रु टाळता । चिंता व्यथेत बुडता ॥ ६४५ ॥
अश्रु गाळता नामात । तेणे आनंद नामात ।
तेणे आनंद चित्तात । तेणे आनंद सर्वात ॥ ६४६ ॥
नामातले अश्रु आनंदाचे । कधी न ते दुःखाचे ।
अश्रु सरतात भेटीचे । पुनर्मिलनाच्या आनंदाचे ॥ ६४७ ॥
नामात आंसवे हांसवे । वेळेवेळेने अनुभवावे ।
कोंडलेले निघावे । तेणे मोकळे करावे ॥ ६४८ ॥
नका कंटाळु नामाला । नाम येऊद्या मुखाला ।
चिंता क्लेश दुःखाला । उपयुक्त विसरायला ॥ ६४९ ॥
नाम घ्यावे येता जाता । कधी न ते कंटाळता ।
ऐशी स्थिती होता । सुखदुःखे विसरता ॥ ६५० ॥
न कंटाळता नामाला । सहज येता मुखाला ।
नाम तारते प्रसंगाला । हेच येते अनुभवाला ॥ ६५१ ॥
नको नामाचा कंटाळा । सदा टाळा कंटाळा ।
नाम असता मुखाला । कंटाळा न वाट्याला ॥ ६५२ ॥
नाम घेता न कंटाळता । कंटाळा नामाने टाळता ।
तेणे उत्साह येता जाता । सदा वाट्याला प्रसन्नता ॥ ६५३ ॥
नाम घेता येता जाता । तेणे कंटाळा टाळता ।
तेणे प्रसन्नता चित्ता । तेणे आनंद चित्ता ॥ ६५४ ॥
प्रारब्धातला एकेक क्षण । असतो विलक्षण ।
नामात घालवता क्षण । न वाटे विलक्षण ॥ ६५५ ॥
प्रारब्ध भोग ऐसे । तेच चित्त जाळतसे ।
जो नामात रमतसे । सहज भोगतसे ॥ ६५६ ॥
प्रारब्ध भोग विचित्र । कधी न स्पष्ट चित्र ।
परी नामास करता मित्र । सर्वच होतात मित्र ॥ ६५७ ॥
नामास मित्र समजा । तेणे भय न काळजा ।
चिंता क्लेश होता वजा । तेणे आनंद मजा ॥ ६५८ ॥
नामात गुंतुन राहाता । तेणे नाममय होता ।
तेणे भयमुक्त होता । भयभीत न होता ॥ ६५९ ॥
व्हावयाचे ते होऊ द्या । नामात जीव रमु द्या ॥
प्रारब्ध भोगास येऊ द्या । तेच म्हणतील येऊ उद्या ॥ ६६० ॥
आपण व्हावे नामाचे । कुणी पाहिले उद्याचे ? ।
नको कारण चिंतेचे । विनाकारण भय त्याचे ॥ ६६१ ॥
आज व्हावे नामाचे । उद्या व्हावे मोहमायेचे ।
तेणे योग मोहमायेचे । न सतावण्याचे ॥ ६६२ ॥
आज रमावे नामात । तेणे आज आनंदात ।
तेणे काल नामात । उद्याही राहाल नामात ॥ ६६३ ॥
आज नामात रमावे । आनंदास लुटावे ।
आनंदात रमावे । ऐसे नित्याचेच व्हावे ॥ ६६४ ॥
भजा भजा नाम आज । आनंद मिळेल आज ।
तेणे शांती मिळेल आज । नामच राखेल लाज ॥ ६६५ ॥
नामात घालवता आज । शांती समाधान आज ।
नामाचा नेम करा आज । प्रसन्नता चित्ता आज ॥ ६६६ ॥
नामास आधार मानावे । नाम मुखी असावे ।
सुखदुःखात नाम घ्यावे । चिंता क्लेश टाळावे ॥ ६६७ ॥
नामास आधार मानता । शांती प्राप्त करता ।
प्रारब्ध सहज भोगता । उद्विग्न न होता ॥ ६६८ ॥
आधार मानावे नामास । नाम असावे मुखास ।
येता जाता त्याचा ध्यास । तेणे भगवंत सहवास ॥ ६६९ ॥
नामास मानवे आधार । तेणे न कधी निराधार ।
त्याच्यावर ठेवता भार । प्रपंचाचा न वाटे भार ॥ ६७० ॥
नामास आधार मानण्यात । तरणोपाय त्यात ।
भयभीत न चित्तात । कुठच्याही प्रसंगात ॥ ६७१ ॥
नामास आधार माना । सुखदुःखे गौण माना ।
शांती समाधान मना । जगु नये नामाविणा ॥ ६७२ ॥
नाम जीवनी मुख्य माना । आनंदाची खान जाणा ।
आनंदीत रहाण्या । जगु नये नामाविणा ॥ ६७३ ॥
नामास मानता प्रमाण । सुखदुःखे समान ।
उणीवेस न स्थान । प्रसन्नतेस स्थान ॥ ६७४ ॥
नामास प्रमाण माना । तेणे आनंद मना ।
प्रसन्नता मना । नाही आनंदाविणा ॥ ६७५ ॥
प्रमाण माना नामास । तेणे आनंद अनुभवास ।
जेथे आनंदाचा वास । तेथे भगवंत वास ॥ ६७६ ॥
नामात सांठला आनंद । तेणे भजता मिळे आनंद ।
सर्वात दिसे आनंद । तेणे आनंदी आनंद ॥ ६७७ ॥
नाम येता मुखाला । आनंद येतो घराला ।
त्याच्या पाहुणचाराला । नामच उपयुक्त त्याला ॥ ६७८ ॥
कुणी कितीही छळु द्या । नाम मुखी असु द्या ।
नामात जीव रमु द्या । तेणे छळाची न बाधा ॥ ६७९ ॥
नाम घेता मुखाला । छळणारा होतो लुळा ।
छळण्याचा येतो कंटाळा । पश्चाताप त्याला ॥ ६८० ॥
मुखी असु द्या नाम । भगवंताचे नाम ।
तेणे आनंदाचे नाम । तेणे आनंदाचे धाम ॥ ६८१ ॥
नामा तुला आळवता । सुटतो विचारांचा गुंता ।
तुझ्यावरच भार ठेवता । निश्चिंती अनुभवता ॥ ६८२ ॥
नामा तुला आळवावे । चिंता क्लेश स्वये जावे ।
स्वस्थता अनुभवावे । सहज सुलभ व्हावे ॥ ६८३ ॥
विचारांचा होता गुंता । चिंताक्रांत होता ।
नामात मन रमवता । सहज सुटतो गुंता ॥ ६८४ ॥
नामस्मरण करावे । नामासच सदा भजावे ।
नामावर सोपवावे । त्यातच हित मानावे ॥ ६८५ ॥
नामात तुम्ही रमता । तेणे नामाचेच होता ।
त्यावर भरंवसा ठेवता । नामच तारते येता जाता ॥ ६८६ ॥
ऐसे नाम भजावे । नामात दंग व्हावे ।
एकरूपतेने भजावे । आनंदाश्रुने न्हावे ॥ ६८७ ॥
ऐसे नाम आळवावे । कंठ दाटून यावे ।
अंतरात्म्याने बोलावे । तेच स्वये ऐकावे ॥ ६८८ ॥
नामाचे बोल बोलता । ईश्वरास संबोधता ।
ते बोल तेणे ऐकता । मदतरूप येता जाता ॥ ६८९ ॥
आपणा आळवता नामास । तेणे आळवता भगवंतास ।
चैन न पडे भगवंतास । स्वयेच येतो दर्शनास ॥ ६९० ॥
नाम घ्यावे मुखाने । भगवंताच्या जाणीवेने ।
नको नाम उणीवेने । परी भगवंताच्या गोडीने ॥ ६९१ ॥
नामा ! आळवावे तुला । आनंद होतो मनाला ।
आनंदाच्या अनुभवाला । नाम पुन्हा पुन्हा मुखाला ॥ ६९२ ॥
आळवावे नामास । तेच उपयुक्त तरण्यास ।
नको फाजील साधनास । सहज सोपे नामास ॥ ६९३ ॥
ऐसे नाम आळवावे । भगवंताने खुष व्हावे ।
तेणे स्वये दर्शन द्यावे । ऐसे जीवन अनुभवावे ॥ ६९४ ॥
ऐसे नाम आळवावे । शुद्ध हेतु जागृत व्हावे ।
शुद्ध सात्विक जगावे । तेणे भगवंताचे व्हावे ॥ ६९५ ॥
आपण होता नामाचे । तेणे योग दर्शनाचे ।
अनुभव आनंदाचे । शांती समाधानाचे ॥ ६९६ ॥
नामास तुम्ही आळवता । अंतर्मन जागृत करता ।
अंतर्मनाचे ऐकता । जीवनी सुसंगतता ॥ ६९७ ॥
नाम आळवा आळवा । तेणे भगवंत आळवा ।
चिंता क्लेश घालवा । आनंद अमृत अनुभवा ॥ ६९८ ॥
ऐसे नाम आळवावे । भगवंतानेच धावावे ।
भक्तांचे होऊन रहावे । मनोरथाचे सारथी व्हावे ॥ ६९९ ॥
रंगुन जा रंगुन जा । नामात रंगुन जा ।
तेणे श्रीहरी भजा । येता जाता नित्य भजा ॥ ७०० ॥
रंगुन जावे रंगुन जावे । नामातच तल्लीन व्हावे ।
आंसु ओघळावे । ऐसे नाम भजावे ॥ ७०१ ॥
भजा भजा हरी भजा । येता जाता त्यास भजा ।
तेणेच भेटे अवघा । करतो हलका बोजा ॥ ७०२ ॥
हरी नाम भजावे हरी । तोच भवदुख्ह हरी ।
येता जाता भजता हरी । दुःख न दाटे उरी ॥ ७०३ ॥
मुखे हरी नाम भजा । तेणे भय न काळजा ।
आनंद उरी बाळगा । हरी हरी म्हणत जा ॥ ७०४ ॥
हरी नाम भजता हरी । हरीच येतो सत्वरी ।
विविध रूपे स्वारी । खुण पटवणारी ॥ ७०५ ॥
हरी हरी हरी हरी । मुखे येऊ दे हरी ।
देहात आत्मा जोवरी । नाम राहु दे मुखावरी ॥ ७०६ ॥
हरी हरी हरी हरी । तुझ्या नामात गोडी भारी ।
येता जाता म्हणता हरी । मधुर बोल जिभेवरी ॥ ७०७ ॥
हरी हरी हरी म्हणा । येता जाता हरी म्हणा ।
प्रारब्ध भोग भोगण्या । नाही सहाय्य हरी विणा ॥ ७०८ ॥
हरी हरी म्हणा हरी । सुख दुःखे म्हणा हरी ।
सुखदुःखाची येरझारी । न वाटणार भारी ॥ ७०९ ॥
हरी हरी हरी हरी । नामात आनंद भारी ।
अहर्निष जपता हरी । तोच भवदुःख हरी ॥ ७१० ॥
हरी हरी हरी हरी । नित्य नाम मुखावरी ।
भाव राहु दे अंतरी । तेणे वदेन मी हरी ॥ ७११ ॥
हरीस नित्य स्मरावे । हरी हरी वदावे ।
हरीस कर्ता करावे । सारे तुझेच म्हणावे ॥ ७१२ ॥
नित्य स्मरा हरी हरी । नामाच्या भरा घागरी ।
त्या उपयुक्त संसारी । नको वृथा दारोदारी ॥ ७१३ ॥
नित्य नाम घेता हरी । सदा नाम ओठावरी ।
तोच देतो भाजी भाकरी । भाव असुद्या उरी ॥ ७१४ ॥
नित्य नाम हरीचे घ्यावे । हरीस सदा स्मरावे ।
अकर्ता भावे जगावे । ‘मी’ स पार विसरावे ॥ ७१५ ॥
हरी हरी वदता हरी । डोळ्यासमोर दिसे हरी ।
रूप सांठता उरी । आनंद होतो मना भारी ॥ ७१६ ॥
वदा वदा हरी हरी । स्मरा प्रत्येक प्रहरी ।
ध्यास लागता अंतरी । भेट होते सत्वरी ॥ ७१७ ॥
हरी हरी वदावे । त्यावर सोपवावे ।
येता जाता स्मरावे । हंसत मुखे जगावे ॥ ७१८ ॥
हरी हरी वदा हरी । सदा वदा मुखे हरी ।
लहा हरी चराचरी । हरी दिसेल सत्वरी ॥ ७१९ ॥
नामे स्मरता हरी । नामात दिसे हरी ।
येता जाता जो उच्चारी । तरेल भवसागरी ॥ ७२० ॥
येता जाता हरी म्हणता । तेणे आनंद होतो मना ।
चिंता काळजी न मना । आनंद वाटे जगताना ॥ ७२१ ॥
हर घडीस भजता हरी । तेणे उद्धार संसारी ।
नको चिंता वृथा उरी । तोच सारी दूर करी ॥ ७२२ ॥
पळ पळ भजता हरी । तोच सोबती श्रीहरी ।
ऐसा भाव च्ज्याच्या उरी । चिंता काळजी न उरी ॥ ७२३ ॥
हरी हरी म्हणावे । तूच तार म्हणावे ।
हरी स्मरणे जगावे । तेच हित मानावे ॥ ७२४ ॥
हरी नाम ओठावरती । तेणे श्रीहरी सोबती ।
जन्मोजन्मी गांठीभेटी । हरी हरी नाम महती ॥ ७२५ ॥
हरी हरी भजताना । आनंद वाटतो मना ।
आनंद वृत्तीने जगताना । शांती समाधान मना ॥ ७२६ ॥
भजा भजा श्रीहरी । येता जाता श्रीहरी ।
एकरूप होता श्रीहरी । विविध रूपे दावे हरी ॥ ७२७ ॥
एकरूपे भजता हरी । विविध भाव अंतरी ।
शुद्ध भाव जो अंतरी । जागृत होतो सत्वरी ॥ ७२८ ॥
हरीनामाच्या तालावरी । लुब्ध होतो श्रीहरी ।
संतोषता श्रीहरी । वर देतो सत्वरी ॥ ७२९ ॥
आम्ही कोण कुणाचे ? । आम्ही श्रीहरीचे ।
नाम घेता श्रीहरीचे । भय न काळजीचे ॥ ७३० ॥
हरी नामाची साथ करा । भवसागरी तरा ।
हरीस जवळ करा । जीव सार्थक करा ॥ ७३१ ॥
हरी हरी भजता । बंधनमुक्त होता ।
हरीस जवळ करता । तुम्ही ऋणमुक्त होता ॥ ७३२ ॥
श्रीहरीस काय हवे ? । अंतरीचे शुद्ध भाव हवे ।
जो स्मरे ऐशा भावे । हरीने जवळ करावे ॥ ७३३ ॥
येता जाता भजता हरी । हरीच सोय करी ।
कृपाप्रसाद त्यावरी । जो राहे हरी नामावरी ॥ ७३४ ॥
काय सांगु हरी महती ? । हरी साठवता चित्ती ।
मोहमाया सोबती । परी चित्ता न जाळती ॥ ७३५ ॥
हरी हरी हरी भजा । येता जाता हरी भजा ।
हरीची होता येजा । तेणे भय न काळजा ॥ ७३६ ॥
हरी हरी भजावे । आत्म्यास संतोषावे ।
हरीत चित्त गुंतवावे । हरीत एकरूप व्हावे ॥ ७३७ ॥
मुखे हरी हरी म्हणावे । सदा हरीमुख पहावे ।
हरीमुखे जे जे निघावे । ते शब्द झेलावे ॥ ७३८ ॥
हरी बोल बोलावे । हरीस बोलका करावे ।
हरीचे शब्द झेलावे । त्यातच हित मानावे ॥ ७३९ ॥
ऐसे वदावे हरी हरी । मुग्ध व्हावे क्षणभरी ।
हरी बोलावर भाळे हरी । जवळ येई सत्वरी ॥ ७४० ॥
हरी हरी वदा सदा । येता जाता हरी सर्वदा ।
हरी दिसावा एकदा । हाच ध्यास असुद्या ॥ ७४१ ॥
येता जाता भजता हरी । देहाची शुद्धता भारी ।
शुद्ध भाव ज्याचे अंतरी । सुकर्मे सदा आचरी ॥ ७४२ ॥
हरी हरी वदा हरी । सदा मुखे भजा हरी ।
आनंद मनास भारी । नयनाश्रु गालावरी ॥ ७४३ ॥
मुखे भजता हरी हरी । हरीमय भाव अंतरी ।
सर्वत्रास दिसे हरी । हरी दिसे चराचरी ॥ ७४४ ॥
मुखे वदा सदा हरी । ध्यास असुद्या अंतरी ।
हरी नामात गोडी भारी । चाखावी वरचेवरी ॥ ७४५ ॥
मनाने व्हावे हरीचे । देहाने व्हावे प्रपंचाचे ।
ऐसे कर्म होई ज्याचे । बोज न प्रपंचाचे ॥ ७४६ ॥
ज्याच्या मुखे हरी हरी । अमृतकुंभ त्याचे घरी ।
सेवता वरचेवरी । जीवास आनंद भारी ॥ ७४७ ॥
हरी नामाचा सूर । काळजीस करे दूर ।
चित्तातली हुरहुर । पळुन जाते दूर ॥ ७४८ ॥
हरीनामाच्या सुरात । हरी श्वासोच्छवासात ।
ऐशा तर्हे जगण्यात । जीवास उद्धरतात ॥ ७४९ ॥
अहर्निश हरी भजता । हरीच ठरतो त्राता ।
हरीस शरण जाता । हरीचे आपण होता ॥ ७५० ॥
येता जाता भजता हरी । कर्ता करविता होतो हरी ।
हरीचे उष्टे ज्याचे घरी । तो जीव धन्य संसारी ॥ ७५१ ॥
हरी हरी भजा हरी । हरी तिमिर नाश करी ।
तेणे प्रकाश सत्वरी । सारी खूबी हरी करी ॥ ७५२ ॥
हरी हरी हरी भजता । ज्ञानोदय अनुभवता ।
तेणे प्रसन्नता चित्ता । तेणे हरीमयच होता ॥ ७५३ ॥
जो जो झाला हरीमय । तो तो तरला भव ।
साधुसंत अनुभव । आपण व्हावे हरीमय ॥ ७५४ ॥
हरीमय होता जीवनी । न मुद्दाम जावे लागे वनी ।
सुखदुःखे अनुभवुनी । चित्ता प्रसन्न ठेवुनी ॥ ७५५ ॥
मुळात हरी लोचट । स्वस्वभावे शोधे भक्त ।
जो जो हरी नामात । लोचट येतो दारात ॥ ७५६ ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणावे । विठ्ठलात रंगुन जावे ।
नामात विठ्ठल पहावे । सर्वात विठ्ठल पहावे ॥ ७५७ ॥
नाम घ्यावे विठ्ठलाचे । तेणे हित प्रपंचाचे ।
नामाने व्हा विठ्ठलाचे । सारे समजा विठ्ठलाचे ॥ ७५८ ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा । शांती समाधान मना ।
आनंद मुखे म्हणा । येता जाता विठ्ठल म्हणा ॥ ७५९ ॥
विठ्ठल विठ्ठल बोला । ओळखाल मायेला ।
विठ्ठल ज्याच्या मुखाला । माया न सतावे त्याला ॥ ७६० ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणावे । त्याचे नाद घुमवावे ।
दुसर्यासही रंगवावे । त्यासही आनंद द्यावे ॥ ७६१ ॥
विठ्ठलाच्या नादात । रहाल तुम्ही आनंदात ।
चिंता भय न चित्तात । विठ्ठलच चित्तात ॥ ७६२ ॥
विठ्ठल च्याच्या मुखी । त्याचा प्रपंच सुखी ।
सदा राहे हंसतमुखी । सुखदुःखे सम लेखी ॥ ७६३ ॥
विठ्ठल विठ्ठल भजावा । त्यात जीव रमवावा ।
ऐसा विठ्ठल भजावा । विषयाचा वीट यावा ॥ ७६४ ॥
विषयाचा येता वीट । विठ्ठलासी देता विट ।
सोडे पंढरीची वाट । भक्ताची धरे वाट ॥ ७६५ ॥
येता जाता विठ्ठल बोला । नयनाश्रु ओघळा ।
माझा विठ्ठल भोळा । रखुमाईसह येतो वेळोवेळा ॥ ७६६ ॥
रमा रमa विठ्ठलात । विठ्ठलाच्या जयघोषात ।
विठ्ठल तोषतो नामात । तारतो वेळप्रसंगात ॥ ७६७ ॥
पंढरपुरी नाही विठ्ठल । विठ्ठल पहावा सकळ ।
कर्तव्य कर्मात विठ्ठल । अकर्ताभावात विठ्ठल ॥ ७६८ ॥
विठ्ठलाचे नाम घ्यावे । विषयास घालवावे ।
विठ्ठलातच रमावे । तेणे विषय विसरावे ॥ ७६९ ॥
विठ्ठल खरा शाश्वत । अजुन भेटे नामात ।
विषय अशाश्वत । व्यथा काळजात ॥ ७७० ॥
सुख नाही विषयात । नको नको विषय चित्तात ।
आनंद विठ्ठलात । साठवावा चित्तात ॥ ७७१ ॥
विषयाचे दुःख पदरी । चिंता काळजी उरी ।
विठ्ठल ज्याच्या मुखावरी । मनोव्यथा जाते दूरी ॥ ७७२ ॥
होता विठ्ठलाचा गजर । विठ्ठल रखुमाई हजर ।
भक्ताच्या हांकेवर । सोडती पंढरपुर ॥ ७७३ ॥
विठ्ठल ज्याच्या मुखावर । त्याचे घर पंढरपुर ।
चिंता काळजी पळे दूर । नाही चित्ती हुरहुर ॥ ७७४ ॥
मुखे म्हणा विठ्ठल । निश्चय असावा अटळ ।
त्यासी भजता पळपळ । पळा पळा आनंद सकळ ॥ ७७५ ॥
विठ्ठलात रंगुन जा । येता जाता विठ्ठल भजा ।
सर्व स्थळी त्याला भजा । सारे विठ्ठलाचे समजा ॥ ७७६ ॥
विठ्ठलाचा होता ध्यास । त्याचा घडे सहवास ।
भक्ताचा होता दास । पहातो प्रपंचास ॥ ७७७ ॥
विठ्ठलाचा ध्यास बाळगा । येता जाता त्यास भजा ।
तोच अन्नदाता समजा । निष्ठेने विठ्ठल भजा ॥ ७७८ ॥
निश्चये भजता विठ्ठल । तेणे वाटचाल सरळ ।
सुकर्मांचे वाढता बळ । चाखाल मधुर फळ ॥ ७७९ ॥
विठ्ठलात गोडी भारी । कळे भजल्यावरी ।
ऐसी गूडी न्यारी । नाही कुठे हो संसारी ॥ ७८० ॥
माझा विठ्ठल भोळा । कनवाळु कृपाळा ।
भजता विठ्ठलाला । तेणे आनंद मनाला ॥ ७८१ ॥
भोळा माझा विठ्ठल । नामात कळे सकळ ।
निश्चय होता अटळ । सदा दिसे विठ्ठल ॥ ७८२ ॥
नको नुसता उपवास । नामाचा हवा सहवास ।
नामाचा असता ध्यास । तेने भगवंत सहवास ॥ ७८३ ॥
विठ्ठलाचा करा गजर । भजा प्रहर नि प्रहर ।
तेणे चिंतेचा विसर । नामात रमवता प्रहर ॥ ७८४ ॥
विठ्ठलाचा करावा नाद । तेणे भेटे निर्विवाद ।
क्षणा क्षणा आनंद । मिळतो निर्विवाद ॥ ७८५ ॥
विठ्ठलात आनंद । नामात होता धुंद ।
होता आनंदी आनंद । जगण्यात आनंद ॥ ७८६ ॥
नाम आळवा नाम । भगवंताचे नाम ।
येता जाता घेता नाम । पैलतीरी मुक्काम ॥ ७८७ ॥
नाम घ्यावे भगवंताचे । तेणे त्याचे व्हावयाचे ।
प्रपंचात रमायचे । त्याचा प्रपंच समजायचे ॥ ७८८ ॥
भगवंतास आळवा । नामात वेळ घालवा ।
तेणे जीव तोषवा । तेणे परमात्मा तोषवा ॥ ७८९ ॥
भगवंताच्या नामात । खरा आनंद त्यात ।
नामाने भजण्यात । आनंद वृत्तीने जगण्यात ॥ ७९० ॥
भगवंताचे नाम । शांती समाधानाचे नाम ।
जगण्यात खरा राम । मुखी असता नाम ॥ ७९१ ॥
नाम न फुकट जाई । नामानेच खात्री होई ।
जो नाम निष्ठेने घेई । भगवंत धाव घेई ॥ ७९२ ॥
नामाचे बोल बोला । तेणे वृत्ती संभाळा ।
नाम तारे प्रसंगाला । तेणे नाम मुखाला ॥ ७९३ ॥
बोला बोला नाम बोला । तेणे आनंद मनाला ।
येता जाता नाम बोला । तेणे शांती मनाला ॥ ७९४ ॥
नाम बोला नाम । भगवंताचे नाम ।
तेणे आनंदाचे धाम । समाधान मुक्काम ॥ ७९५ ॥
नामाच्या निश्चयात । सातत्य कृत्यात ।
यशाच्या दालनात । आपण प्रवेशतात ॥ ७९६ ॥
नामाचा करा निश्चय । नाम भजा अक्षय ।
तेणे पुण्य संचय । पापाचा होतो क्षय ॥ ७९७ ॥
नामाच्या निश्चयात । नाम येते मुखात ।
तेणे पुण्य फळात । सत्कर्मे आचरणात ॥ ७९८ ॥
नामाचा निश्चय करा । नाम मार्ग सोपा बरा ।
प्रपंचाचा पसारा । न वाटे बोजवारा ॥ ७९९ ॥
निश्चय करा नामाच । तेणे प्रपंच सुखाचा ।
येता प्रसंग दुःखाचा । आधार वाटे नामाचा ॥ ८०० ॥
नामाचा आधार मोठा । नाही संत बोल खोटा ।
नाही आनंदा तोटा । नामात लाभ मोठा ॥ ८०१ ॥
जो जो रहातो नामात । तो तो रहातो आनंदात ।
डोलतो आनंदात । नाम येता मुखात ॥ ८०२ ॥
नाम सर्वदा साधक । नाही कधी ते बाधक ।
प्रपंचास तारक । सदा आनंद दायक ॥ ८०३ ॥
नामात आनंद मोठा । घ्यावा येता जाता ।
प्रपंची नामच त्राता । कळे नाम भजता ॥ ८०४ ॥
राहुन प्रपंचात । रहाता नामात ।
नाम न आड त्यात । हेच कळे नामात ॥ ८०५ ॥
नाम माझा सखा । तोच पाठीराखा ।
नामाचे बोल ऐका । तरा जीवन नौका ॥ ८०६ ॥
जीवन नौकेत । नाम वल्हे उपयुक्त ।
खळखळत्या पाण्यात । नामाची साथ ॥ ८०७ ॥
नामाची वल्हे घेता । पैलरीर गाठता
भोवर्यात न गुंतता । नामानेच पुढे जाता ॥ ८०८ ॥
संसाराच्या सागरात । प्रचंड खळखळाट ।
नाम येता मुखात । भयभीती न चित्तात ॥ ८०९ ॥
नामाच्या जोरावर । तरता भवसागर ।
गाठता पैलतीर । नाम येता मुखावर ॥ ८१० ॥
नाम बोलता अक्षय । पळुन जातो विषय ।
तेणे होता निर्भय । तेने आनंदमय ॥ ८११ ॥
नाही आनंद विषयात । ठासुन भरला तो नामात ।
संत बोल ऐकण्यात । हित समजा त्यात ॥ ८१२ ॥
नामाचा घ्यावा अनुभव । नामात होता निर्भय ।
होता तुम्ही नाममय । सहज तरता भव ॥ ८१३ ॥
नामाच्या अनुभवात । शहाणे व्यवहारात ।
नाम नसता मुखात । मूर्खताच पदरात ॥ ८१४ ॥
नामाची असता साथ । प्रसंगावर मात ।
शांती समाधाने जगण्यात । निर्विवादे नामात ॥ ८१५ ॥
साथ असता नामाची । भिती न भयाची ।
पुढच्या वाटचालीची । हिम्मत व्हावयाची ॥ ८१६ ॥
संतांचे बोल ऐकावे । नामातच रमावे ।
तेणे आनंदी व्हावे । अनुभव घ्यावे ॥ ८१७ ॥
संतबोल एकेक । नामाचे बोल कित्येक ।
अनुभव एकेक । संत सांगती कित्येक ॥ ८१८ ॥
संत नामाने तरले । अनुभव जमा झाले ।
नामातच हित भले । अनुभव घेणे भले ॥ ८१९ ॥
संतांचा बोल खराखुरा । नामच त्यांस आसरा ।
नामात दिवाळी दसरा । दिसे आपल्या घरा ॥ ८२० ॥
खरा खुरा आनंद । नामात निर्विवाद ।
नको फुकट वाद । नामाचा घुमवा नाद ॥ ८२१ ॥
फुकटच्या वादात । शांती गमावतात ।
राहाता नामस्मरणात । शांती मिळवतात ॥ ८२२ ॥
नामाचे आदेश पाळा । मनाचे संशय टाळा ।
महत्व द्यावे नामाला । नको महत्व मनाला ॥ ८२३ ॥
नामावर अवलंवावे । शंकेस स्थान नसावे ।
नाम श्रद्धेने भजावे । श्रद्धायुक्त जगावे ॥ ८२४ ॥
श्रद्धायुक्त नामाला । आनंद वाटे मनाला ।
आनंद तोषायला । नाम येऊद्या मुखाला ॥ ८२५ ॥
श्रद्धेचे महतव फार । त्यात नामाचे सार ।
जो श्रद्धेने भजणार । आनंदीच रहाणार ॥ ८२६ ॥
नामावर श्रद्धा ठेवता । निश्चिंतपणे जगता ।
चिंता नसता चित्ता । उद्विग्नता न चित्ता ॥ ८२७ ॥
श्रद्धा ठेवा नामावर । संत बोलले आजवर ।
जे जे राहिले श्रद्धेवर । तरले भवसागर ॥ ८२८ ॥
श्रद्धेने नाम भजता । श्रद्धेने भव तरता ।
अश्रद्धेने जगता । चिंतायुक्त जगता ॥ ८२९ ॥
नाम येता जाता घेता । प्रेरणा प्राप्त करता ।
पडताळुन पहाता । श्रद्धेनेच जगता ॥ ८३० ॥
नाम ज्याच्या मुखाला । श्रद्धेचे फळ त्याला ।
सुसह्यपणे जगण्याला । मनःशांती मनाला ॥ ८३१ ॥
नामात जे जे मिळते । ते ते श्रद्धेचे असते ।
श्रद्धेला महत्व देण्याते । जीवन सफल होते ॥ ८३२ ॥
नामातल्या ज्या प्रेरणा । त्या त्या आनंद देण्या ।
मनःशांती मिळण्या । नाही नाम श्रद्धेविणा ॥ ८३३ ॥
नाम श्रद्धेने भजा भजा । अश्रधा सदा त्यजा ।
श्रद्धायुक्त जगत जा । अनुभव मिळवत जा ॥ ८३४ ॥
नाम घ्यावे भगवंताचे । कर्तव्य समजायचे ।
देहाचे ऋण फेडायचे । जाणीवेत रहायचे ॥ ८३५ ॥
जन्म लाभला नामासाठी । जन कल्याणासाठी ।
जन्म परोपकारासाठी । जन्म परमार्थासाठी ॥ ८३६ ॥
नामात तुम्ही असता । परमार्थात असता ।
प्रपंचात जरी राहाता । परी नाम मुखे भजता ॥ ८३७ ॥
नको उसना संन्यास । नाम येऊ द्या मुखास ।
राहुनी प्रपंचास । सहज भजता नामास ॥ ८३८ ॥
नाम मुखी असता । प्रपंच त्याचा म्हणता ।
प्रपंचात होऊन राहाता । अकर्ताभावे जगता ॥ ८३९ ॥
नाम ज्याच्या मुखात । प्रपंच न बाधक ।
न तो पीडादायक । सदा सुसह्यकारक ॥ ८४० ॥
जमा उधार नामातले । वेगळे व्यवहारातले ।
उसने जरी घेतलेले । तापदायक नसलेले ॥ ८४१ ॥
नामातले वैभव आगळे । कळे जे नामामुळे ।
खरेखुरे शाश्वतातले । अशाश्वत त्यजलेले ॥ ८४२ ॥
शाश्वताची गोडी वेगळी । नामाने सोय केली ।
नामात जी जी रमली । शाश्वतमय झाली ॥ ८४३ ॥
नामच मुळात शाश्वत । कैसे होईल अशाश्वत ? ।
तेणे नाम भजण्यात । शाश्वतच पुढ्यात ॥ ८४४ ॥
नाम मुखे भजता । शाश्वतच भजता ।
वेगळे काही न करता । सहजभावे जगता ॥ ८४५ ॥
आपण व्हावे नामाचे । तेणे व्हाल शाश्वताचे ।
जे जे झाले नामाचे । अनुभव शाश्वताचे ॥ ८४६ ॥
आपण नाम भजावे । तेणे शाश्वत दिसावे ।
ऐसे नाम भजावे । शाश्वतच पुढी यावे ॥ ८४७ ॥
नुसते नाम भजण्यात । शाश्वते जगण्यात ।
नुसत्याच चिंतनात । काय येणार पुढ्यात ? ॥ ८४८ ॥
नाम भजण्यात सोपे । विना खटाटोपे ।
जो नामा प्रपंच सोपे । न तापे प्रपंच तापे ॥ ८४९ ॥
केव्हाही करा नामस्मरण । न त्यास कसले बंधन ।
येता जाता नामस्मरण । येता जाता संभाषण ॥ ८५० ॥
नाम उपयुक्त सर्वांस । बाल, स्त्री, पुरुषांस ।
नाम न वगळे कुणास । जवळ करे सर्वांस ॥ ८५१ ॥
नामातली उपयुक्तता । कळे नामयुक्त असता ।
अनुसंधानात असता । उपयुक्तता टिकवता ॥ ८५२ ॥
हरी नामात आहे गोडी । भजता भजता हरी जोडी ।
नाम भजता हरघडी । हरी मुक्काम हरघडी ॥ ८५३ ॥
हरी हरी भजावे । हरीस नित्य भजावे ।
येता जाता भजावे ।हरी हरी म्हणावे ॥ ८५४ ॥
हरी हरी नित्य प्रहरी । नाम येऊ द्या मुखावरी ।
अवमंबता हरी वरी । सदा संतोष अंतरी ॥ ८५५ ॥
हरी हरी नित्य म्हणावे । सारे हरीचेच म्हणावे ।
हरीस कर्ता करावे । स्वस्थ चित्त अनुभवावे ॥ ८५६ ॥
हरीनामाचा अनुभव । संत तरले भव ।
संतांचे घेण्या अनुभव । आपण व्हावे हरीमय ॥ ८५७ ॥
हरी हरी हरी बोला । मुखे हरी हरी बोला ।
एक एक शब्द तोला । नंतरच तो बोला ॥ ८५८ ॥
हरी हरी नित्य प्रहरी । तेणे हरी नित्य प्रहरी ।
येता जाता वदता हरी । हरीच वसतो घरी ॥ ८५९ ॥
हरीच राहुद्या उरी । तेणे चिंता न राहे उरी ।
हरी हरी मुखावरी । तेणे आनंद साठे उरी ॥ ८६० ॥
हरी हरी म्हणत जा । हरीस नित्य पहात जा ।
हरी रूपे आठवत जा । त्याचा आनंद लुटत जा ॥ ८६१ ॥
हरी नामात जो आनंद । कळे त्यात होता धुंद ।
इतुका न कोठे आनंद । संत सांगे निर्विवाद ॥ ८६२ ॥
हरी नामाची गोडी न्यारी । प्रत्येक प्रहरी वाढणारी ।
गोडी जी जी चाखणारी । धन्य धन्य ती संसारी ॥ ८६३ ॥
गोडी भारी न्यारी न्यारी । वदता सदा हरी हरी ।
हरी सदा भजल्यावरी । गोडी हरी बरोबरी ॥ ८६४ ॥
नाम भजा नित्य नित्य । संत बोलात खरा अर्थ ।
हरी नामात आहे तथ्य । त्रिकालबाधित सत्य ॥ ८६५ ॥
अविरत भजता हरी । सर्व त्याचे म्हटल्यावरी ।
चिंता काळजी न उरी । हरीच सदा वसे उरी ॥ ८६६ ॥
हरी नाम मुखावरी । येता जात नित्य प्रहरी ।
हरीच वसतो उरी । कैसी चिंता राहे उरी ? ॥ ८६७ ॥
हरी हरी वदा सदा । वदा वदा हरी सर्वदा ।
हरीस पहाता एकदा । हरीच दिसे सर्वदा ॥ ८६८ ॥
हरी नाम वदता वदता । प्रसन्नता अनुभवता ।
स्वस्थ चित्ते जगता । हंसतमुखे जगता ॥ ८६९ ॥
हरीनाम वदताना । आनंद सदा जगताना ।
हरीस आळवताना । आनंदाश्रु नयनांना ॥ ८७० ॥
हरीस आळवा केव्हाही । कुठच्याही प्रसंगीही ।
हरीच उभा केव्हाही । रक्षण्या धाव घेई ॥ ८७१ ॥
हरीस आळवा हरीस । आळवा तुम्ही हर घडीस ।
हरी नामात परीस । सुवर्णच हरघडीस ॥ ८७२ ॥
हरी हरी मुखे बोला । ऐकु येऊ द्या त्याला ।
भक्ताच्या हांकेला । धावुन येई रक्षणाला ॥ ८७३ ॥
हरीभक्ती सर्वांस । हरी न वगळे कुणास ।
जो भजे हरी नामास । हरीच दिसे सर्वत्रांस ॥ ८७४ ॥
येता जाता भजता हरी । सकळांत दिसे हरी ।
नाही भेद अंतरी । हरीच भेद दूर करी ॥ ८७५ ॥
हरी नाही हो एकेरी । कळे हरी भजल्यावरी ।
एकास भजल्यावरी । दोघे भेटे सत्वरी ॥ ८७६ ॥
हरीस प्रिय सकळ । सर्वांस करे जवळ ।
हरीत दिसते सकळ । तेणे हरीनाम अटळ ॥ ८७७ ॥
हरी हरी म्हणा हरी । तेणे आनंद मना भारी ।
हरी नाम भजल्यावरी । आनंदाच्या राशी घरी ॥ ८७८ ॥
हरी हरी भजता । हरी जवळ असता ।
हरीस सदा पहाता । आनंद अनुभवता ॥ ८७९ ॥
हरी हरी बोलता । येता जाता हरी बोलता ।
अंतर्मुखे हरी पहाता । बहिर्मुखे वावरता ॥ ८८० ॥
हरी हरी बोलावे । हरीसच बोलवावे ।
भोवताल विसरावे । हरीमयच व्हावे ॥ ८८१ ॥
हरीमय होता होता । भोवताल विसरता ।
हरीनामात धुंद होता । वेगळा आनंद अनुभवता ॥ ८८२ ॥
नामास करा जवळ । तेणेच ज्ञान सकळ ।
मोहमाया मृगजळ । नाही लागणार झळ ॥ ८८३ ॥
नामास जवळ करा । नामाचा खरा आसरा ।
तोच मार्ग सदा बरा । भगवंता जवळ करा ॥ ८८४ ॥
नामास करता जवळ । तेणे नामाचे सुफळ ।
अशांतीचा पळ । शांतीचा सुकाळ ॥ ८८५ ॥
नाम घ्या हो नाम । येता जाता भजा नाम ।
सहज सोपे नाम । नका मोजु दाम ॥ ८८६ ॥
नामात विचार सात्विक । तेणे कर्मे सात्विक ।
सुफळे सात्विक । आनंद सात्विक ॥ ८८७ ॥
नामात सत्वगुण । येता जाता करा मंथन ।
तेने होता आचरण । तेणे सदा सदाचरण ॥ ८८८ ॥
नामात पहाता रूप । भगवंताचे स्वरूप ।
त्याचेशी होता एकरूप । पहाता आनंदरूप ॥ ८८९ ॥
नामात रूप दिसते । तन्मय व्हावे लागते ।
तन्मयतेने मिळते । नामाने साध्य होते ॥ ८९० ॥
नामात होता तन्मय । होता आनंदमय ।
चिंता क्लेश भय । त्याचा होतो क्षय ॥ ८९१ ॥
नाम भजता अक्षय । आनंद मिळे अक्षय ।
उद्विग्नतेचा क्षय । चित्त शांतीची सोय ॥ ८९२ ॥
नाम अक्षय भजावे । प्रेरणामय व्हावे ।
पडताळुन पहावे । दृढनिश्चयी व्हावे ॥ ८९३ ॥
नाम भजावे आपणासाठी । मनःशांतीसाठी ।
स्वार्थ परमार्थासाठी । जीवोद्धारासाठी ॥ ८९४ ॥
देह झिजवा नामासाठी । नाम उपयुक्त देहासाठी ।
जन्मोजन्मीचा साथी । नामाशिवाय कोण जगती ? ॥ ८९५ ॥
जीवोद्धार नामात । तेणी रहावे नामात ।
संत बोल उपयुक्त । अनुभवता नामात ॥ ८९६ ॥
नाम घ्यावे कुणासाठी ? । आपल्या जीवासाठी ।
आनंद देण्यासाठी । मनःशांतीसाठी ॥ ८९७ ॥
नाम घ्यावे कर्तव्याने । देहाच्या जाणीवेने ।
नाम आळवा मनाने । प्रसन्न व्हावे त्याने ॥ ८९८ ॥
नामात होता रममाण । आनंदी होता आपण ।
अनुभवता ऐसे क्षण । नित्य करता नामस्मरण ॥ ८९९ ॥
संकल्प करा नामाचा । संकल्प करा आनंदाचा ।
प्रारब्ध भोग भोगण्याचा । नाही त्रास जाणवायचा ॥ ९०० ॥
नाम भजा अहर्निश । नामाचा करा जयघोष ।
नामात दोषांचा र्हास । गुणांचाच सहवास ॥ ९०१ ॥
नामाचा करता जयघोष । सद्गुणांची रास ।
निर्गुण सगुणास । विविध रूपास ॥ ९०२ ॥
नामात रूपे विविध । तेणे बोध विविध ।
नेमका काय बोध । नामच करे बोध ॥ ९०३ ॥
नामस्मरणे बोध होतो । तोच मार्ग दावतो ।
जो मार्ग अवलंबतो । तो भवसागर तरतो ॥ ९०४ ॥
नामात बोध होता । स्वस्थता अनुभवता ।
नामाचे आदेश पाळता । सहजपणे जगता ॥ ९०५ ॥
नामात बोध कशाचा ? । नामात बोध शाश्वताचा ।
ऐसा मार्ग आचरण्याचा । हितावह ठरायचा ॥ ९०६ ॥
नामाने शाश्वत कळते । अशाश्वत पळते ।
शाश्वतात मन रमते । जीवाचे सार्थक होते ॥ ९०७ ॥
श्रद्धा ठेवता नामावर । श्रद्धा भगवंतावर ।
श्रद्धा ठेवता शाश्वतावर । जाता पैलतीरावर ॥ ९०८ ॥
नामाचे शब्द रोकडे । नाही कधी मागेपुढे ।
योग्य वेळेस योग्य पुढे । तेणेच उकले कोडे ॥ ९०९ ॥
नामात दडले सत्य । जीवास उपयुक्त ।
जितुके तुम्ही नामात । तितुके तुम्ही सत्यात ॥ ९१० ॥
नका शोधु सत्य ।नाम भजा नित्य ।
नामात दडलेले सत्य । कळते भजता नाम नित्य ॥ ९११ ॥
नामास करता जवळ । कळे सत्य सकळ ।
सत्यास करता जवळ । असत्याची न वाटचाल ॥ ९१२ ॥
नामात नित्य रमावे । तेच हित मानावे ।
नामावर सोपवावे । त्याच्या आदेशे जगावे ॥ ९१३ ॥
नामात नित्य रमता । आत्म्यास नित्य तोषता ।
परमात्म्यास तोषता । जरी प्रपंच करता ॥ ९१४ ॥
प्रपंची नाम त्राता । तेणे नाम भजता ।
गाफिल न रहाता । प्रपंच करता ॥ ९१५ ॥
परमार्थाची साधने । नाम, भजन, कीर्तने ।
रमता एकनिष्ठेने । तरता भव खात्रीने ॥ ९१६ ॥
परमार्थाच्या साधनात । नाम सहज सोपे त्यात ।
कुठच्याही प्रसंगात । नाही अवडंबर त्यात ॥ ९१७ ॥
सहज सोपा नाम मार्ग । कुणीही पत्करा मार्ग ।
पत्करता नाम मार्ग । कधी न आडमार्ग ॥ ९१८ ॥
येता जाता घेता नाम । भवतापास रामराम ।
कोणतेही भजा नाम । आनंद मिळे ठाम ॥ ९१९ ॥
नाम घ्या हो नाम । स्वार्थासाठी नाम ।
चित्तशांती साठी नाम । आनंदासाठी नाम ॥ ९२० ॥
येता जाता नाम भजता । स्वयेच जागृत होता ।
प्रारब्ध भोग जाणता । तैशी पाऊले टाकता ॥ ९२१ ॥
भगवंताच्या नामात । आनंद क्षणाक्षणात ।
नामाच्या सातत्यात । भगवंत सहवासात ॥ ९२२ ॥
नाम कुणीही भजा । पण श्रद्धेने भजा ।
येता जाता भजा । आनंद लुटत जा ॥ ९२३ ॥
नामासाठी नाही काळवेळ । उपयुक्त सर्व वेळ ।
प्रारब्धातले खेळ । नामानेच सुमेळ ॥ ९२४ ॥
नाम घेता आनंदाने । जगाल तुम्ही खात्रीने ।
सुखदुःखाच्या त्रासाने । न त्रस्त व्हाल त्याने ॥ ९२५ ॥
नाम असावे मुखी । सुखदुःखे सारखी ।
जो नामाची गोडी चाखी । तो अमृतच चाखी ॥ ९२६ ॥
नामात प्रेरणा अनेक । आदेश एक एक ।
ते पाळता एक एक । तोषता कित्येक ॥ ९२७ ॥
सुख समृद्धी वैभव । काय घेता त्याची चव ! ।
नामाची घेता चव । सर्वच वाटे बेचव ॥ ९२८ ॥
सुख समृद्धी वैभवात । सुखदुःखे त्यात ।
नामाच्या आनंदात । आनंदाच्या वैभवात ॥ ९२९ ॥
धनाच्या समृद्धीने । कधी न तृप्ती न त्याने ।
नामाच्या सातत्याने । सदा तृप्तच त्याने ॥ ९३० ॥
नामात सर्व मिळते । नाम भजता कळते ।
नामात जे जे मिळते । ते न कशात मिळते ॥ ९३१ ॥
नामात मुख्य मिळते । गौण न टिकते ।
शांती समाधान मिळते । वासना न उरते ॥ ९३२ ॥
नेमके काय करावे ? । नामानेच सुचवावे ।
तेणे नाम भजावे । आदेश पालन करावे ॥ ९३३ ॥
प्रपंचातली सुखदुःखे । चित्ता जाळती सारखे ।
नाम भजता मुखे । विरती सुखदुःखे ॥ ९३४ ॥
देहाचे एकेक चोजले । नामानेच कळे ।
पुरे जाहले चोजले । स्वये आपण बोले ॥ ९३५ ॥
येता जाता नाम भजता । देहास विसरता ।
नामास विसरता । देहास सजवता ॥ ९३६ ॥
किती सजवणार देहास ? । अशाश्वतास ! ।
नाम येऊद्या मुखास । तेणे शाश्वतास ॥ ९३७ ॥
देहाच्या एकेक सुखास । जाळते चित्तास ।
नका भजु देहास । सदा भजा नामास ॥ ९३८ ॥
जातीभेद नामास । मान्य न कधी त्यास ।
कुणीही भजावे नामास । जवळ करेल त्यास ॥ ९३९ ॥
कुणीही नाम भजावे । जातीभेद विसरावे ।
भगवंतास पहावे । चराचरी स्मरावे ॥ ९४० ॥
कुणीही नाम भजता । आनंदच प्राप्त करता ।
आनंद सर्वांकरता । नाही एकट्यापुरता ॥ ९४१ ॥
संत तरले नामावर । नाही भेदभावावर ।
नामाच्या भरंवशावर । सर्वच तरले आजवर ॥ ९४२ ॥
नामावर भरंवसा ठेवा । भरंवशानेच जगता ।
भरंवसाच ठरतो त्राता । कळले नाम घेता ॥ ९४३ ॥
नाम जपावे मुखाने । केव्हांही हंसतमुखाने ।
रहाल हंसत मुखाने । रहाल आनंदाने ॥ ९४४ ॥
नाम येता मुखात । सुखदुःखे विरतात ।
चिंता नष्ट होतात । सदा प्रसन्ने जगतात ॥ ९४५ ॥
मुखी नाम येता । नाममयच होता ।
नामात तल्लीन होता । देहभान विसरता ॥ ९४६ ॥
आत्मा जोवरी देहात । तोवरी रहावे नामात ।
नामाच्या सातत्यात । उद्विग्नता न मनात ॥ ९४७ ॥
नाम घ्यावे येताजाता । जरी सवड न मिळता ।
प्रारब्ध सहज भोगता । भयभीत न होता ॥ ९४८ ॥
नाम घेता मुखाने । जगाल आत्मनिर्धाराने ।
मनोबळ वाढल्याने । जगाल खात्रीने ॥ ९४९ ॥
नाम असता मुखात । ठाम निश्चय मनात ।
निश्चयाने जगण्यात । सुयश प्रयत्नात ॥ ९५० ॥
नाम मुखी असता । धर्मरतच रहाता ।
धर्माचरणे वागता । भगवत्कृपेने जगता ॥ ९५१ ॥
मुखी असता नाम । धर्माचाच मुक्काम ।
अधर्मास रामराम । सत्कृत्येच ठाम ॥ ९५२ ॥
नाम मुखी येता । प्रारब्ध भोग जाणता ।
विपरीत प्रसंग येता । सदाचरणे जगता ॥ ९५३ ॥
नाम मुखी येता । चिंतनमय होता ।
बरेवाईट कळता । सत्कर्मेच करता ॥ ९५४ ॥
नामाचा लागता लळा । सत्वृत्तींचा लळा ।
सत्वृत्ती आचरणाला । सुफळे नशीबाला ॥ ९५५ ॥
नाम घ्यावे नाम । भगवंताचे नाम ।
तळमळीने घ्यावे नाम । आंतरंगाच्या ओढीने नाम ॥ ९५६ ॥
नामाच्या तळमळीला । नाम येते मुखाला ।
तेणे एकेक प्रसंगाला । शिकाल तोंड द्यायला ॥ ९५७ ॥
नामाच्या तळमळीत । नाम रसभरीत ।
नाम रसाच्या तृप्तीत । आनंदाच्या तृप्तीत ॥ ९५८ ॥
नाम घेता तळमळीने । हांक मारता खात्रीने ।
बोलावता हक्काने । तो येतो प्रेमाने ॥ ९५९ ॥
तळमळीच्या नामात । भगवंत पुढ्यात ।
भगवंताशी बोलण्यात । आनंदी आनंद मनात ॥ ९६० ॥
तळमळीला फार महत्व। नामातच कळते तत्व ।
मनोमन पटता तत्व । नामालाच महत्व ॥ ९६१ ॥
महत्व आहे तळमळीला । अंतरंगाच्या ओढीला ।
येताजाता नाम मुखाला । वाढवता तळमळीला ॥ ९६२ ॥
तळमळीत सर्व मिळते । हेही नामातच कळते ।
तेणे नाम मुखी येते । येता जाता भजणे होते ॥ ९६३ ॥
तळमळीने जे जे प्राप्त । नाही कशात ते प्राप्त ।
नामाने तळमळ प्राप्त । नामातच सर्व प्राप्त ॥ ९६४ ॥
नाम येता मुखाला । जाणता तळमळीला ।
तेणे नामाच्या ओढीला । येताजाता मुखाला ॥ ९६५ ॥
तळमळीवाचुन नामास । शुष्क रटाळ भकास ।
तळमळीयुक्त नामास । आनंद प्रेरणा उल्हास ॥ ९६६ ॥
नामाविण काही नाही । नामातच सर्व काही ।
जे जे नामात नाही । ते ते कुठेही नाही ॥ ९६७ ॥
नामात सर्व आहे । तेणे नाममय व्हावे ।
नामात तल्लीन व्हावे । सर्व प्राप्त करावे ॥ ९६८ ॥
नामात जे जे मिळते । नाम भजता कळते ।
श्रद्धेने नाम भजण्याते । श्रद्धायुक्त जीवन होते ॥ ९६९ ॥
नामात श्रद्धा ठेवा । संतांचा बोल आठवा ।
संत अनुभव घ्यावा । जीव सत्कारणी लावा ॥ ९७० ॥
नामाने प्रेरणा अनेक । श्रद्धेने भजता नाम एक ।
नामावर तरले कित्येक । आपणही व्हावे एक ॥ ९७१ ॥
नामातल्या प्रेरणा । प्रफुल्ल करे मना ।
शांती समाधाने जगण्या । नाम उपयुक्त जाणा ॥ ९७२ ॥
नामात शांती साठली । संतांनी अनुभवली ।
प्रपंच माया लोपली । शांती उदया आली ॥ ९७३ ॥
नामात शांती निश्चित । नामाजवळ स्थित ।
शांती नामाची आश्रित । तेणे नामात व्हावे स्थित ॥ ९७४ ॥
नामात शांती मिळते । नाम भजता कळते ।
नाम ज्याच्या मुखी असते । शांती त्यास मिळते ॥ ९७५ ॥
जीवनी शांतीस महत्व । तेणे नामास महत्व ।
नामात खरे सत्व । नामातच शाश्वत तत्व ॥ ९७६ ॥
नका भटकु शांतीसाठी । नामातच शांती प्राप्ती ।
संत बोल सांठवा चित्ती । अनुभवा जीवनी शांती ॥ ९७७ ॥
नाम ज्याच्या मुखात । तो शांती समाधानात ।
नका भटकु अशाश्वतात । रहावे आत्म्याच्या आवाजात ॥ ९७८ ॥
नाम भजा नाम । शांतीसाठी नाम ।
निश्चय करा ठाम । सोडु नका नाम ॥ ९७९ ॥
कुठच्याही प्रहरी नाम । कुठच्याही प्रसंगी नाम ।
श्रद्धेने भजता नाम । प्रपंचात दिसे राम ॥ ९८० ॥
नामाचा निश्चय पक्का । जीवनात हुकुमी एक्का ।
तरण्या जीवन नौका । नामच माझा सखा ॥ ९८१ ॥
श्रद्धा ठेवा नामावर । नको दुसरी कशावर ।
अवलंबता नामावर । रहाल शाश्वतावर ॥ ९८२ ॥
श्रद्धा ठेवता नामात । जगाल शाश्वतात ।
अशाश्वत त्यजण्यात । मनःशांती लाभे त्यात ॥ ९८३ ॥
धनाने हुरळु नका । नामाचे बोल ऐका ।
धनलोभ एकसारखा । तेणेच जीवनी धोका ॥ ९८४ ॥
नामाचा निश्चय करावा । नामात वेळ घालवा ।
आज नामाला आळवा । आज काळाला घालवा ॥ ९८५ ॥
नामाचा निश्चय करा । नामच बनेल आसरा ।
नको जीव कावरा बावरा । नामात तुम्ही सावरा ॥ ९८६ ॥
नामाच्या निश्चयात । निश्चयाचे बोल चित्तात ।
निश्चयाने वागण्यात । रहाता आत्मविश्वासात ॥ ९८७ ॥
नाम पाप विनाशक । कुठेही भजा नाम एक ।
अनुभव घ्या एकेक । संतांचे बोल अकेक ॥ ९८८ ॥
नका पडु सिद्धी मागे । रहावे नामात जागे ।
नामानेच होता जागे । कधी न पडाल सिद्धीमागे ॥ ९८९ ॥
नाम तुम्हा सदा तारक । सिद्धी कधी कधी बाधक ।
नामच तुम्हा पोषक । सिद्धी अहंकारास ॥ ९९० ॥
नाम घ्यावे भल्यासाठी । न भलते होण्यासाठी ।
भलतेच टाळण्यासाठी । सदा भजावे त्यासाठी ॥ ९९१ ॥
ज्याच्या मुखी नाम येते । त्याला कळते भलते ।
सावधच रहाण्याते । सर्व काही मिळते ॥ ९९२ ॥
नाम असते ज्याच्या मुखी । तो सदा हंसतमुखी ।
आनंदाच्या अगणिक राशी । सहज येती त्याचे पाशी ॥ ९९३ ॥
नाम मुखी असण्यात । भाग्यच समजा त्यात ।
सहज सोपे मिळवतात । नामाशी तुम्ही राहाण्यात ॥ ९९४ ॥
नको चिंतन प्रारब्धाचे । आपण व्हावे नामाचे ।
भोग जे जे नशीबाचे । सुसह्ये भोगायचे ॥ ९९५ ॥
प्रारब्धाच्या चिंतनात । नाना यातना त्यात ।
परी नामाच्या चिंतनात । आनंदच मिळे त्यात ॥ ९९६ ॥
नाम भजा इतुके । नको परके पोरके ।
नको लाड देहाचे । लाड करा नामाचे ॥ ९९७ ॥
नाम इतुके भजावे । वेळेचेही भान नसावे ।
काळानेही सावध व्हावे । इतुके नाम भजावे ॥ ९९८ ॥
भजा भजा नाम इतुके । काही न चाले काळाचे ।
भय न आपणा त्याचे । भयमुक्त जगण्याचे ॥ ९९९ ॥
नामात आनंद इतुका । पेढा खाण्या इतुका ।
गोडी चाखण्याचा । अट्टाहास करायचा ॥ १००० ॥
नामात आहे आनंद । भजता मिळे आनंद ।
प्राप्त करता आनंद । व्हाल आनंदीआनंद ॥ १००१ ॥
आनंद अवर्णनीय । आपण घ्यावा अनुभव ।
होता तुम्ही नाममय । व्हाल आनंदमय ॥ १००२ ॥
नामात कळतो स्वार्थ । कळे जीवनाचा अर्थ ।
नामच चालवे चरीतार्थ । साधता परमार्थ ॥ १००३ ॥
नामात स्वार्थ परमार्थ । जीवनाचा खरा अर्थ ।
नामच खरे उपयुक्त । हेच म्हणणे सार्थ ॥ १००४ ॥
नामात रमता अर्थ । अन्यथा जीवन व्यर्थ ।
नामच खरे समर्थ । भजता व्हाल समर्थ ॥ १००५ ॥
नामाचे मंदीर बनवा । तेणे प्रसन्न व्हा ।
शांती समाधान पहा । आनंदी आनंदी व्हा ॥ १००६ ॥
नामाच्या मंदीरात । आत्मानंद वसे त्यात ।
त्याची पूजा करण्यात । प्रसन्नता चित्तात ॥ १००७ ॥
नामाचे मंदीर ऐसे । थक्कच व्हावे ऐसे ।
मंदीरातुन हलावेसे । कधीच वाटत नसे ॥ १००८ ॥